
Discrimination in Advertising
Sakal
- मीनाक्षी मेनन, संस्थापिका- GenS Life
Discrimination in Advertising: कलबुर्गीच्या ७० वर्षीय गृहस्थाने २२०० किमीचा पायी प्रवास केला, तर केरळच्या ८६ आणि ८४ वर्षीय बहिणींनी युरोपचा दौरा केला. अशा प्रेरणादायी बातम्या आपल्याला थक्क करतात. पण हे वास्तव असूनही, भारतीय जाहिरातींमध्ये आजही ६० वर्षांवरील लोकांविषयी साचेबंद आणि नकारात्मक प्रतिमा दाखवली जाते. लोकप्रिय संस्कृतीतील वृद्धांचे हे चित्र केवळ समाजातील समजुतीच नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासावरही परिणाम करतं.