Ambedkar Jayanti 2020 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जगात मापदंड ठरावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

photo

'पंचसूत्री' चा करा अवलंब

Ambedkar Jayanti 2020 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जगात मापदंड ठरावी

औरंगाबाद : जगभरात कोरोना व्हायरसने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही झाल्याने सध्या आपण सरकारी लॉकडाऊन' मध्ये आहोत. लॉकडाऊन मध्येच यंदाची १४ एप्रिल अर्थात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आली आहे. दरवर्षी धुमधडाक्यात सार्वजनिक रित्या साजऱ्या होणाऱ्या या वार्षिक आनंदोत्सवावर विरजण पडले आहे. असे असले तरीही, हिरमोड होण्याचे कारण नाही. आपण जयंती साजरी करू, अवश्य करू पण ती पुढील 'पंचसूत्री' चे काटेकोर पालन करून आनंदात जयंती साजरी करुया.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

ही आहे पंचसूत्री

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण आपल्याच घरात साजरी करू शकता. संविधान वाचा आणि सोशल मीडियावर सामायिक करा. बाबासाहेबांची पुस्तके वाचा. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायक पैलू आठवा आणि त्यांचा प्रसार करा.
- लॉकडाऊनमुळे देशातील बरीच लोकं भुकेली आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा.
- बाबासाहेब आंबेडकर यांचे समतावादी संदेश सोशल मीडियावर पोहोचवण्यासाठी काय केले पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार होऊ शकेल आणि बाबासाहेबांबद्दलची ओढ वाढू शकेल.असा दूरगामी कार्यक्रम तयार करा नि त्याची अंमलबजावणी करा.
- बाबासाहेबांनी या देशातील बहूजन समाजासाठी लक्षणीय कामे केली आहेत. जसे की हिंदू कोड बिल, रिझर्व्ह बँकेची स्थापना, धरण प्रकल्प आदी...या त्यांच्या समाजोपयोगी कार्याचा प्रसार, प्रसार करा.
- बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पुन्हा वाचल्या पाहिजेत, त्या नीट समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या आपल्या दैनंदिन जीवनात  कृतीत आणण्याचा निश्चय करा.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बोट दाखवण्याची संधी नको

ही 'पंचसूत्री' आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास तीच खरी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीदिनी आदरांजली ठरेल. कोणत्याही परिस्थितीत 'लॉक-डाउन'चे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रयत्न करा. कारण कोरोना महामारी ही देशासाठी मोठी आपत्ती आहे. कोणालाही आपल्यावर आणि पर्यायाने समाजाकडे बोट दाखवण्याची संधी मिळणार नाही. जर आपण हे केले, तर आपण बाबासाहेबांच्या हेतूस समर्थन देऊ शकाल. आपण यंदा साजरी केलेली आगळीवेगळी आंबेडकर जयंती देशभरातच नव्हे, तर जगात मापदंड ठरेल.

 

loading image
go to top