Blog: अनिल मेहता-एक प्रकाशक स्नेही हरपला

महाराष्ट्रातील ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे निधन हे माझ्यासाठी दुःखद व हळहळजनक वृत्त होय. गेली तीस वर्षे आम्ही एकमेकांच्या संप्र्कात होतो.
Veteran publisher Anil Mehta is remembered for his contribution to Marathi literature and publishing.

Veteran publisher Anil Mehta is remembered for his contribution to Marathi literature and publishing.

esakal

Updated on: 

विजय नाईक,

नवी दिल्ली: १९९३ मध्ये ‘ दै.सकाळ’ तर्फे दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवादाची सांगता होत असताना तेथील परिस्थितीचे अध्यय़न व वार्तांकन करण्यासाठी मी तेथे गेलो होतो. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे पितामह नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली कृष्णवर्णियांचे पहिले सरकार तेथे आले. हा सारा इतिहासपट मी माझ्या लेखातून व नंतर ‘मंडेलांच्या देशातून’ या पुस्तकातून मांडला. हे पुस्तक प्रसिद्ध केले, ते मेहता प्रकाशनचे त्यावेळचे सर्वेसर्वा अनिल मेहता यांनी. ‘वंशभेदाविरूद्ध संघर्ष करून बलिदान देणाऱ्या लाखो कृष्णवर्णियांच्या स्मृती व दक्षिण आफ्रिकेच्या परिवर्तनाचे प्रणेते डॉ नेल्सन मंडेला’ यांना ते अर्पण केले आहे. त्याची प्रथमावृत्ती मेहता प्रकाशनने १९९६ मध्ये प्रसिद्ध केली, तेव्हापासून मी व अनिल मेहता व नंतर त्यांचे चिरंजीव सुनील मेहता यांच्या कायमच्या संपर्कात राहिलो व अनिलभाईंशी मैत्री घनिष्ट होत गेली.

Loading content, please wait...