मन वढाय वढाय : आनंदी जीवनाची कला

art of happy living lifestyle marathi news
art of happy living lifestyle marathi news

सांगली : दिवसाचे सोळा तास काम करण्याची सवय असणारे अल्बर्ट एलिस अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत एकदा म्हणाले, " अंथरूणाला खिळून राहिल्यावर काम करता येत नाही, ही अविवेकी कल्पना आहे. चिंतनाच्या कामात कुठलाच आजार तुम्हाला अडवू शकत नाही.' या एलिस यांनी विवेकनिष्ठ मानसशास्त्राचा पाया घातला. त्यांच्या "विवेकनिष्ठ मानसशास्र' हा शोधनिबंधातील निष्कर्ष म्हणजे आनंदी जीवनाची कला आहे. 

माणूस त्याचं आयुष्य त्याला हवं तसं का जगू शकत नाही, त्याची जगण्यासाठीची धडपडत नेहमी अपुरीच का वाटते, त्याला नेमकं काय हवं असतं, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध माणसाला विवेकनिष्ठ विचारसरणीकडे नेतो. बऱ्याचदा आजूबाजूच्या परिस्थितीशी माणसाला जुळवून घेता येत नाही. गुण्यागोविंदानं-आनंदानं जगायची इच्छा असूनही केवळ विवेकवादी विचारांच्या अभावामुळं त्याला दुःखाला सामोरे जावं लागतं. दु:ख, त्रास, कटकट, छळ, द्वेष, स्पर्धा, ढोंग यात त्याचं आयुष्य जातं. 

आजूबाजूच्या घटना चांगल्या किंवा वाईट नसतात. त्याकडे मनुष्य पाहतो कसं, त्याचा अन्वयार्थ कसा लावतो यावर त्याचं बरं-वाईट स्वरुप ठरतं. या परिस्थितीत बुद्धी-विवेकाचा उपयोग करून आपण जीवनातील अस्वस्थता दूर करु शकतो. हेच एलिस याचं संशोधन होतं. ते म्हणतात, विचारात योग्य ते बदल करुन स्वत:च्या वर्तनात चांगले बदल घडवता येतात. अशाप्रकारे विचारात बदल झाल्यानंतर मनात ते नवे विचार रुजवणे सहज शक्‍य होते. या नव्या विचारानुसार कृती करण्यास प्रोत्साहन दिले तर बदलांचे उचित परिणाम साध्य होतात. 

पूर्वीच्या किंवा सध्याच्या घटना अस्वस्थता देतात. अस्वस्थता अशा वाईट अनुभवांमुळेच येते का, तसेच अशा घटना घडतात तेंव्हा चिंता, उदासी, काळजी, राग, द्वेष इ.भावना तीव्र असतात का, त्या भावनांच्या अतिरेकाला आपण कारणीभूत असतो का, स्वत:ला दोष देत जगत असतो का, या प्रश्‍नांची उत्तरे "हो' असतील तर मग एखादी खंत पुढे ती दिर्घकाळ सलत राहणार. मनावर राज्य करणार हे निश्‍चित. त्यामुळे या त्रास देणाऱ्या घटनेच्या विचारात आयुष्य घालवण्यापेक्षा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर ? तीच आनंदी जीवनाची कला आहे. 

archanamulay5@gmail .com 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com