
बीडमधील मशिदीत जिलेटीन स्टीक्सने स्फोट घडवून आणण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी विजय रामा गव्हाणे व श्रीराम अशोक सागडे यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त चिंताजनक होय. दोघेही हिंदू. गव्हाणे याने जिलेटीन स्टिक्स हातात घेतल्याचा व्हिडिओ स्वतःच्या इन्स्टाग्राम आकौंटवर टाकल्याचे वृत्तात म्हटले आहे. हिंदू व मुस्लिम यांच्यात गेल्या दहा ते पंधरा वर्षात वाढलेल्या धार्मिक वैमनस्याचे हे प्रतीक आहे काय? या वैमनस्याने अस्वस्थ हिंदू अतिरेकाकडे वळतोय का? असे प्रश्न उपस्थित होतात.