
The Other Side Of Diplomacy
Sakal
आंतरराष्ट्रीय शिष्टाई किंवा डिप्लोमसीला आंतरराष्ट्रीय `मुत्सद्देगिरी’ असाही शब्द आहे. एका बाजूला असतो राजदूत व दुसऱ्या बाजूला असते त्याची पत्नी. राजदूताच्या यशाचे श्रेय बऱ्याच प्रमाणात त्याच्या पत्नीला असते.
याचे कारण, आल्या गेल्या अतिमहत्वाच्या वक्तीची सरबराई करणे, दूतावासातील स्वयंपाकघराचा ताबा घेऊन मोठमोठ्या पार्ट्या य़शस्वी करणे की ज्या योगे आलेला देशी व विदेशी पाहुणा खूष होईल. हे सारे राजदूताच्या पत्नीला करावे लागते. राजदूताचे जीवन म्हणजे `विंचवाचे बिर्हाड पाठीवर’ असल्यासारखे असते. अर्थात राजदूत म्हणजे विंचू नव्हे. अनेक वेळा अगदी थोडा अवधी असताना एकादेशातून दुसऱ्या देशात त्यांच्या बदल्या होतात. आणि क्षणाचाही विलंब न करता दोन तीन वर्षे ज्या देशात घालविली, तेथून त्यांना अन्य देशात जावे लागते.