
नवी दिल्ली : तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीच्या `राजकीय चिखलात’ भारतीय जनता पक्षाचे `कमळ’ उगवले. `राजकीय चिखल’ हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे या विधानसभा निवडणुकीत अत्यंत खालची पातळी गाठून भाजप, आम आदमी पक्ष व काँग्रेसने प्रचारात एकमेकांवर दुगाण्या झाडण्याचा अतिरेक केला.