अ स्टोलन लाईफ...

Jaycee Dugard
Jaycee Dugard

एका आई आणि मुलीची ही गोष्ट.. अठरा वर्षे हरविलेल्या आपल्या मुलीची वाट पाहणारी आई आणि आईने दिलेल्या एका अंगठीच्या आधारे कधीतरी ती परत दिसेल अशी आशा बाळगणारी  जेसी ली डूगार्ड ही मुलगी. अगदी सामान्य आयुष्य जगणारी ही जेसी..आपल्या आईवर नितांत प्रेम करणारी. एक छोटी बहिण आणि सावत्र वडील असे छोटसे कुटुंब असणारी जेसी. 10 जून 1991 मध्ये कॅलिफोर्नियातील साउथ लेक ताहो येथे नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाली आणि फिलीप व नॅन्सी गरीडो या क्रूर दाम्पत्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर अठरा वर्षे कैदेत असणारी जेसी हिने सहन कलेले अत्याचार, आपण कधीतरी आईला परत भेटणार अशी तिची दूर्दम्य आशा, या सगळ्या परिस्थितीत 13व्या आणि 15व्या वर्षी दोन मुलींना गॅरेजमध्ये दिलेला जन्म अशी तिची वेदनादायक आणि विश्वास न बसणारी कहाणी. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जेसीने आपले अनुभव शेअर केले आहेत आपल्या ''अ स्टोलन लाईफ'' या पुस्तकामधून.

''Let's get one thing straight! My name is Jaycee Lee Dugard. I
was kidnapped by a stranger at age eleven.  I believe I shouldn't be
ashamed for what happened to me, and I want Phillip Garrido to
know that I no longer have to keep his secret.'' असे म्हणत जेसी आपल्याबद्दल सांगते...

मला आजही तो दिवस स्पष्ट आठवतो. त्यादिवशी मी गुलाबी रंगाचे कपडे घातले होते. आणि मला शाळेत जाण्याचा कंटाळा आला होता. पण माझी उन्हाळ्याची सुटी जवळ आली होती आणि आम्ही मैत्रिणींनी एक छोटी ट्रिप ठरविली होती. त्याचे सगळे प्लॅनिंग बाकी असल्याने मी शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. पण आज जातानाच मला अस्वस्थ वाटत होते. रोज कामावर जाताना आई मला गुडबाय म्हणून जाते. आज ती पण घाईत माझ्याशी काही न बोलताच निघून गेली होती. शेजारचा कुत्रा मला रोज शाळेच्या बस पर्यंत सोडायला येतो... पण आज तोही दिसला नाही..असे सगळे विचार माझ्या मनात सुरु होते आणि मी बस येते त्या ठिकाणी निघाले. चालत असतानाच अचानक मागून एक व्हॅन आली आणि मला काही कळण्याच्या आतच त्यातून एक माणूस आला आणि मला ''शॉक स्टिकच्या'' सहाय्याने त्याने अधू केले. माझे हात बांधले आणि मला गाडीत घातले.. मला काय झाले..काय चालेले आहे काहीच कळत नव्हते..मी फक्त ओरडण्याचा प्रयत्न करत होते पण अधू झाल्याने माझा आवाजच फुटत नव्हता..काही वेळाने मला वाटू लागले हे फक्त एक वाईट स्वप्न आहे.. आता मी उठेन आणि आई मला पटकन मिठी मारेल..आणि हे सगळं संपेल... पण असं काहीही झालं नाही..

अचानक गाडी थांबली आणि त्या अज्ञात व्यक्तिने मागचा दरवाजा उघडला मला खाली उतरायला सांगितले. गाडीत त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती.. पण पुढे बसलेली ही व्यक्ती पुरुष होती की महिला हे कळत नव्हते. मी कशीबशी खाली उतरले. त्यानी मला शांतपणे चालायला सांगितले. मी जर आवाज केला तर परत मला शॉक देण्याची धमकीही दिली. घाबरुन मी तो सांगेल तसे करत होते. आम्ही एका घरात प्रवेश केला. त्यातील एका खोलीत त्याने माझे हात बांधले व तो निघून गेला..

त्यानंतर किती वेळ गेला माहित नाही..मी जमिनीवर बसून होते..आईला कळाले असेल का माझ्याबरोबर काय झाले ? मला ती शोधत असेल..माझ्या बरोबर हे काय होतंय.. मधेच एखाद्या रेल्वेचा आवाज येत होता. हा आवाज मी लक्षात ठेवला पाहिजे.. मी आईला सापडले की, तीला सांगेन मला ठेवले होते त्या जागेच्या आसपास रेल्वे जाते.. असे अनेक विचार माझ्या मनात येत होते. एवढ्यात परत दरवाजा उघडला त्या व्यक्तिने माझ्यासाठी मिल्कशेक आणला होता. मी फक्त म्हणाले माझ्या आईकडे खूप पैसे नाहीत पण तुम्ही मला नीट तिच्यापर्यंत पैसे नाहीत, पण मला तीच्यापर्यंत पोहोचवले तर तिच्याजवळचे सगळे पैसे ती तुम्हाला देईल.. खरचं..? येवढेच म्हणून तो माणूस हसला आणि निघून गेला.

परत तो माणूस आला तेव्हा एक बॅग घेऊन आला. माझ्या कपड्यांसहीत सर्व वस्तू त्याने जप्त केल्या....

त्यानंतर घडत गेलेल्या घटनांचे आणि तिच्यावर झालेल्या अत्याचारांचे हृदयद्रावक वर्णन तिने आपल्या पुस्तकातून केले आहे.  

अठरा वर्षाच्या या कैदेत जेसीला आपले स्वत:चे नाव उच्चारण्याचीही मुभा नव्हती. अत्याचार करणारा फिलिप गरीडो आणि त्याची पत्नी नॅन्सी गरीडो या दोनच व्यक्तिंना अठरा वर्षात तीने पाहीले. जीवंत राहण्यासाठी तीला जे करावे लागले ते तीने केले.. आणि आपल्या आईच्या आठवणी मनात कायम ठेवल्या... 

अखेर 26 ऑगस्ट 2009ला जेसीची सुटका करण्यात आली. त्यानंतर 2011 मध्ये तीने आपले हे अनुभव कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता ''अ स्टोलन लाईफ'' या पुस्तकातून मांडले. आपले आयुष्य पूर्ववत होण्यासाठी जेसी आता धडपडत आहे. आपल्या त्या दोन मुलींना शिकवत आहे. आणि नव्या पुस्तकाच्या माध्यमातून ''freedom: my book of firsts'' जगण्यासाठीच्या धडपडीचे वर्णन करत आहे.

'' आयुष्यात एखादा क्षण येतो की आपल्याला वाटते आता कोणतीच आशा उरलेली नाही आणि आपण हतबल होतो..पण एखादा आशेचा किरण तुमच्या हृदयात नेहमी असतो. त्याच्यावर विश्वास ठेवा''
- जेसी ली डूगार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com