कंटेंपररी फॅब्रिक ज्वेलरी

FabricJewelry
FabricJewelry

पारंपारिक दागिन्यांची आवड तर महिलांना असतेच पण सध्याच्या नवीन जनरेशला मात्र वेगवेगळ्या ज्वेलरीचे हटके प्रकार खुणावत असतात. त्यामुळे कंटेंपररी ज्वेलरीची सध्या चलती आहे. यातलाच एक प्रकार म्हणजे फॅब्रिक ज्वेलरी. आपल्या आवडत्या कापडाच्या प्रकारात, विविध टेक्श्चरमध्ये ही ज्वेलरी खरेदी करता येऊ शकते. पटोला, प्रिंटेड कॉटन, बांधणी, बाटीक, सिल्क अशा विविध कापडांपासून तयार केलेली ही ज्वेलरी 'ईकोफ्रेंडली' देखील आहे.

महाराष्ट्रातील पारंपारिक खणाच्या कापडापासून तयार केलेल्या पर्स, फोल्डर्स, बॅग हे प्रकार तर आपण पाहिलेच असतील. तसेच याच कापडापासून तयार केलेली ज्वेलरी देखील ट्रेंडी दिसते. यामध्ये खणाचे सुंदर पारंपारिक रंग आणि काठ यांचा वापर केल्याने साडीवर तर ही ज्वेलरी सुंदर दिसतेच पण जिन्स किंवा कुर्तिजवर देखील हा प्रकार खास दिसतो. यामध्ये शक्यतोवर गळ्यातल्यांचे प्रकार जास्त बघायला मिळतात. 

खणाबरोबरच 'ज्यूट'मध्येही ज्वेलरीचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ज्यूटच्या कापडावर ज्यूटच्याच रंगिबेरंगी दोऱ्यांनी केलेले सुंदर नक्शिकाम यामध्ये असते. स्कर्ट्स, पलाझो अशा वेस्टर्न आऊटफिट्सवर ह्या ज्वेलरीमुळे नवा लूक तुम्हाला मिळेल. ज्यूट ज्वेलरी हा प्रकार पश्चिम बंगालमध्ये आपल्याला जास्त बगायला मिळतो. येथील ज्यूट ज्वेलरीमध्ये राईस पर्ल्स बरोबर वेगवेगळ्या रंगीत दोर्यांचा वापर केलेला असतो. बंगालमधील काही ब्रॅंड्स ऑनलाईन या प्रकारची ज्वेलरी विकतात.

रंगिबेरंगी फॅब्रिक स्टड्स
बोल्ड लूकची आवड नसेल तर वेगवेगळ्या कापडांपासून तयार केलेल्या छोट्या स्टड्स/ टॉपस्चा समावेश तुमच्या फॅशमध्ये करता येईल. यात पेस्टल (इंग्लिश) रंगांचा वापर केलेला दिसतो. त्यामुळे डेलीयुज किंवा ऑफिसवेअर म्हणून हे स्टड्स उत्तम आहेत. याची खरेदी करण्यासाठी मात्र थोडा ऑनलाईन सर्च करावा लागेल. 

बिड्स ज्वेलरी
वेगवेळ्या कापडापासून वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे, टेक्श्चरचे बिड्स तयार करता येतात. याच फॅब्रिक बिड्सपासून तयार केलेले कानातले, फॅब्रिक बिड्सच्या माळा, ब्रेसलेट्स असे प्रकार यात बघायला मिळतात. ज्वेलरी मेकींगची आवड असेल तर हे प्रकार घरी देखील तयार करता येऊ शकतात. बिड्स पासून तयार केल्यामुळे हा प्रकार थोडा बोल्ड दिसतो. परंतु साडीवर कॉन्ट्रास्ट मॅचिंग केल्यास एलिगंट फॅशन दिसते. 

ऑनलाईन खरेदी करण्याबरोबरच काही हॅण्डमेड वस्तूंच्या प्रदर्शनात याप्ररकाची ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळेल. किंवा काही फॅब्रिक ज्वेलरीचे पुण्या-मुंबईतील ब्रॅंड्स हव्या त्या कापडात कस्टमाईझ्ड् ज्वेलरी करुनही देतात. शिवाय त्यांच्यातर्फे याप्रकारच्या ज्वेलरी मेकिंगच्या कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. ज्वेलरी मेकिंगचे तंत्र एकदा अवगत झाले तर तुमच्या कल्पकतेप्रमाणे घरच्या घरीही हे दागिने बनविणे सहज शक्‍य आहे. कापडाच्या अंसख्य प्रकारांचा यात वापर करता येईल आणि नक्किच तुमची फॅशन हटके दिसेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com