गुरुपौर्णिमा : होय ... तूच माझा गुरू; तुम्हीच माझे गुरुवर्य

गुरुपौर्णिमा : होय ... तूच माझा गुरू; तुम्हीच माझे गुरुवर्य

आज गुरुपौर्णिमेनिमित्त.. जरा वेगळा विचार करूया म्हटलं.

कालपरत्वे..... युगानुयुगे..... !!  गुरू म्हणायचं कोणाला
ज्ञान देणाऱ्याला ? ? 
ज्ञान देऊन गुरुदक्षिणा घेणाऱ्याला ? ? 
ज्ञान देऊन कोणतीच अपेक्षा न करणाऱ्याला ? ? 
दिशाक्लिष्ठ ज्ञान देऊन स्वःअनुभवसंपन्न होण्यास भाग 
पाडणाऱ्याला ? ?
निव्वळ सहवासात राहून मार्गदर्शन करणाऱ्याला ? ?
की, आपल्यापेक्षा जास्त पावसाळे पाहणाऱ्याला ? ? 


प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुवर्य मंडळी अनेक टप्प्यांवर अवतरतात.. आपणास सहकार्य करण्याहेतू सूर्य-चंद्र-गुरू आदी..इतरादी ग्रहांना साथ देण्यास भाग पाडण्याचे तेजस्वी कार्य-कर्तव्य करतात ; जन्मदात्या आई वडिलांपासून प्रारंभ होत.. गर्भातून पृथ्वीवर येताच रडण्यास भाग पाडणारे डॉक्टरही गुरुच म्हणावे लागतील. सर्वांचाच प्रवास गतिमान होत आहे. व्यवस्थापरिवर्तनामध्ये सारेच सहाय्यभूत घटक प्रत्येकाच्या हातात आले आहेत. अशावेळी आपण मनुष्यगण.. मग् ते देवगण असोत की राक्षसगण, आपण सर्वजण " सजीव " असल्याचे आकलन, हे गुरुवर्य मंडळीच करून देत आले आहेत. हे शृंखलाबद्ध महाअभियान केवळ गुरूंच्याच अधिकारात येते !!

सर्वांगी प्रबोधन करण्याचे सामर्थ्य प्रत्येक गुरूमध्ये असतेच.. मग तो गुरू, सात्विक असो.. आस्तिक असो.. अथवा नास्तिक !! 
अक्राळ-विक्राळ प्रस्तुतीकरणाचे मूलभूत शास्त्र अन शस्त्र दोन्हीही गुरुच देत आला आहे. अवघ्या चार युगांमधून ही परंपरा संथपणे चालत आली आहे. गुरूच्या व्याख्या बदलत आल्या. पण आजही कार्य आणि कर्तव्यदक्षता तीच आहे !! छोट्या - मोठया गोष्टीमधून गौप्यस्फोट करण्याची किमयादेखील गुरू सामर्थ्यात असतेच. मला वयाच्या १ ते ५ पर्यंतच्या गोष्टीचे स्मरण होत नाही, गरजही नाही. आयुष्याच्या या प्रथम चारणामध्ये,  पंचमहाभूतच रक्षणार्थ गुरुसमान आपल्यासोबत नृत्य-हस्य-क्रिडा करीत असतात. या वयातच लाभलेले तृप्त शक्तींचे सहवास आपल्याला पुढे गुरू-सानिध्याकडे आगेकूच करण्यास भाग पाडतात.

नैतिक विचारांचे एकत्रीकरण करायचे असल्यास कोण्याएका गुरूच्या आशिर्वादावर भागणारे काम नाही, त्यासाठी असंख्य गुरुजणांचे सकल मार्गदर्शन प्रस्थापित व्हावे लागते.

गुरुपौर्णिमा म्हटलं की शाळेची आठवण येणारच !! कोल्हापुरातील प्रख्यात आणि सर्वोत्कृष्ट शाळा : माईसाहेब बावडेकर, या शालेयकुटीमध्ये तुमच्यासारख्या सोज्वळ मित्रांसोबत आमचे शिक्षण सुरू झाले.. पावलोपावली प्रत्येक क्षणांची भूमीती माझ्या डोळ्यात बसू लागली.. प्रत्येक सजीवनिर्जिव अवस्थांचे निरीक्षण करण्याची कला रुजू लागली.. त्यावेळचे गुरू होते ते माझे मित्र-मैत्रिणीच...नकळत यांचाच सहवास मला त्या सुखांपर्यंत नेत होता. त्याक्षणी शिक्षकांकडून मिळणाऱ्या शिक्षणाच्या त्रिज्या वर्तुळाबाहेर न जाणाऱ्या होत्या. त्यामुळे वर्तुळाबाहेरचे विश्व दाखवणारे गुरुसमान नव्हे.. तर जरा हटके गुरुच म्हणा की, आवश्यक होतेच....पुढे पुढे.. शिक्षण घेत घेत.. मीही एका टप्प्यावर शिक्षक झालो तेव्हा मला माझ्या विद्यार्थ्यांकडून मिळालेले प्रेम आणि सदिच्छा आजही घेऊन मी जगतोय !! त्या त्या वेळचे जटील वाटणारे  पण आत्ताचे मऊ हृदयागत भासणारे आदर्शवत गुरू ; आम्हास ज्ञानार्जन करत असतानाचे चित्र, एका कागदावर बसण्यासारखे नाही. एकत्रित चित्र इतके विशाल असेल की त्या कागदावरील दृष्य पाहण्यासाठी आपल्याकडेच विशालनयन असण्याची गरज भासेल !! 

गुरू असण्याचा मान-सन्मान  केवळ ज्ञानार्जीत महाषयांकडे नसतो तर.. तो निःस्वार्थ बुद्धीने परित्याग स्वरूप विश्वची सुंदर पाहुइच्छिणाऱ्यासदेखील असतो. गुरू म्हणजे केवळ शिक्षणासाठी पारंगत करणारा 'वली' असे काही मुळीच नसावे.. काहीवेळेस अनोळखी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि सारे जीवनच बदलून टाकते...!! समाजातील, वाचा-बुद्धी असणारा कोणीही-कोणाचाही गुरू ठरू शकतो. कदाचित धर्मपत्नी तिच्या पतीचा गुरू किंवा पती हा पत्नीचा गुरू असू शकेल. आजकल तर वयात काय राहिलच नाही.. पाच वर्षाच मूल पन्नास वर्षाच्या पुरुषालाही अनन्यसाधारण गुरुकृपा देईल !!

आज कलयुगात, खरा गुरू कोणअसेल, तर तो .. मित्रच !!
दोस्त ( तो / ती ) !! हे प्रामाणिकपणे मान्य करावेच लागेल.. 

मित्रासारखा मित्र आहे माझ्याकडे पण.. गुरूसमान मित्र अजूनही नाही माझ्याकडे
तुम्ही होऊ शकाल का माझे खरे मित्र व गुरुदेखील.. ? ? ... जो आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर कसे जावे, याचे आकलनासह बोधही करून देईल. खरी गरज आहे ती इथे... प्रेमाच्या नावाखाली किंमतशून्य गोष्टींचा अवलंब करणारे, स्वनिर्मित-जाळ्यात स्वतःलाच स्वतः बंदिस्त करून घेत अतिगतिमान समजणाऱ्या आपल्या पिढीला आज खऱ्या गुरूमित्राची गरज आहे. अन्यथा तारुण्याचा भारतदेश, गुरुविना अपुराच राहून जाईल.

नकळत अनेक शिक्षकांना आम्ही दिलेल्या अपशब्दांच्या चारोळ्या, कुठेतरी मनात खूप खोलवर घर करून होत्या, त्यांना बाहेर काढण्याची व्रतपरिक्रमा अजून सुरूच आहे आणि ते कार्यही गुरुच साध्य करून घेतील !! मुळात प्रत्येक वेळचा आपला बालिशपणा आपण मान्य करत पुढे जाऊ शकतोच म्हणा.. पण त्यात काय मजा नाही.. गुरुचरणी स्वतःच्या चुकांचे गार्हाणे मांडण्याचं मोठं धैर्य असावं लागतं आणि ते अचानक माझ्यात आलं.. आणि सर्व माफिरामायण मांडत प्रत्येक आदरणीय गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची माझी इच्छा जागृत झाली.. आज सकाळी नित्य देवपूजा सुरू असता देवासमोरच साऱ्या कृतज्ञता व्यक्त केल्या ।। आणि काही गुरुंप्रति झालेल्या नकळत चुकांचे श्लोकही मांडले ।। तेव्हा जरा जास्तच लज्जा वाटत होती पण लज्जाहिंन बनून गुरुप्रति शिव्या-शाप देण्यापेक्षा त्यांचा आशिर्वाद घेण्यासच मला तूर्तास मोह वाटला !!

जाता.. जाता..
प्रत्येक व्यक्तीसह, एखाद्या दगडाकडूनही काहिनाकाही मिळेल अशी अपेक्षा गाठीशी धरून भक्कम मार्ग शोधण्यास प्रवृत्त होता येईल अशी व्यापक मागणी व्यक्त करतो. पुनःश्च.. आजवर माझ्या चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या ज्ञानसंपत्ती मिळवण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या 
आजी.. माजी.. छोट्या.. मोठ्या.. स्त्री.. पुरुष.. ज्ञात.. अज्ञात.. गुरुवर्यांस कोटी कोटी कायमस्वरूपी प्रणाम !!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com