कोणतीही लिंक क्लिक करताय? हॅकर्सपासून सावधान! (भाग-2)

कोणतीही लिंक क्लिक करताय? हॅकर्सपासून सावधान! (भाग-2)

एका मैत्रिणीचा मेसेज आला की तिचं फेसबुक पेज हॅक झालंय. त्या पेज वरून भलतंच कोणी ऍड्स चालवत आहे. जरा तपास केल्यावर असं लक्षात आलं की तिला 'तुमचं अकाउंट/पेज कोणीतरी रिपोर्ट केलं आहे आणि ते डी-ऍक्टिव्हेट होणार आहे' असा मेसेज आला होता. ते डी-ऍक्टिव्हेट होऊ नये म्हणून तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून अकाउंट व्हेरिफाय करा असं त्या मेसेज मध्ये लिहिलं होतं.

तिनं अर्थातच घाबरून जाऊन घाईनं ती लिंक क्लिक केली. त्या लिंककवर आलेल्या पानावर आपला फेसबुक पासवर्ड वगैरे देऊन लॉगिन केलं. आणि पुढच्या काही मिनिटांत तिचं पेज हॅक झालं!

हा अगदी पद्धतशीर सापळा असतो. तो ओळखायचा आणि टाळायचा कसा याच्या काही टिप्स!!

तर अत्यंत महत्वाची टिप अशी की कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी ती कोणाकडून (म्हणजे कोणत्या स्रोतातून / सोर्स कडून आली आहे आणि ती लिंक नेमकी काय आहे हे लक्षात घ्यायला हवं.

01. स्रोत / सोर्स
माझ्या मैत्रिणीला आलेला मेसेज हा खरंतर मेसेज नव्हता. Blocking Page नावच्या ऑफिशियल दिसणाऱ्या ID नी तिच्या पेजच्या वॉलवर मेसेज पोस्ट केला आणि तो शेअर केला.
इथे लक्षात ठेवायची गोष्ट अशी की अकाउंट डी-ऍक्टिवेशन किंवा व्हेरिफिकेशन सारखे महत्वाचे मेसेजेस फेसबुक आपल्या वॉलवर (किंवा पेजवर) कधीच पोस्ट करत नाही. आपल्याला नोटिफिकेशन सेंटर किंवा सिक्युरिटी रिव्ह्यू मध्ये दाखवतं. त्यामुळे आपली (किंवा आपल्या पेजची) वॉल ओपन असेल तर त्यावर आलेल्या कोणत्याही, अगदी ऑफिशियल दिसण्याऱ्या आयडी कडून आलेल्याही संदेशावर विश्वास ठेवू नका.

आपल्याला कोणताही मेसेज ***कोणी*** पाठवला आहे हे तपासणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्यानं पाठवलाय तो ***कसा*** पाठवलाय हेही बघणं गरजेचं आहे.

डेंजरस लिंक ओळखायच्या कशा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com