पैशाने मैत्रीची भावना विकत घेता येते?

FRIENDSHIP
FRIENDSHIP

आयुष्य सुंदर आहे पण ते आनंदाने अनुभवायला एक साथ हवी असते आपले बोलणे मनोरंजक असून ते ऐकणारं कोणीतरी असाव लागत. एकंदरीत आपल्या जीवनात एखादा सखा किंवा सखी अपेक्षित असते जी आपल्याला समजून घेईल आपल्या भावना ओळखून त्यांना प्रतिसाद देईल. ही अपेक्षा जरी खरी आणि चांगली असेल तरी याच अपेक्षेला आपल्या फायद्यासाठी वापरून नाजूक मनाच्या व्यक्तींचा उपयोग करणे ही नवी पद्धत आजकाल वापरात आली आहे.

फ्रेंडशिप क्लब ही संकल्पना ऐकायला जरी भावत असेल तरी त्यातला फोलपणा हा खूप मोठा आहे . मैत्री आणि भावनांच्या शोधात असणाऱ्या व्यक्तीकडून पैसे उकळून त्याला खोट्या नात्यात अडकवल जात या नात्यातील संभाषण फोनवर होते प्रत्यक्षात नाही. एखाद्या आवाजाची सवय झाली की मनाची गुंतवणूक होते ती गुंतवणूक तोडण्याच्या शब्दावर लोकांचा बळी पाडण्यात येतो. पैशाने सर्व गोष्टी विकत घेता येत नाहीत अस म्हणतात पण सध्या अशा क्लबच्या नावावर मैत्रीचा बाजार उपलब्ध झाला आहे. ऐकटेपणा संपवण्याच्या विचाराने अशा गोष्टींना बळी पडून आर्थिक त्रासाबरोबर मानसिक त्रास ही होतो. आपल्या फोन वर सहसा असे मेसेज येत राहतात मैत्री किंवा प्रेम ही भावना  विकण्याच्या हिशोबाने गरजूंना आकर्षित केलं जात.

यामुळे अशा खोट्या जाहिरातींच्या मायाजळात अडकून आपल्या सुंदर जीवनात अडथळे निर्माण करण्यापेक्षा भरपूर चांगले पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फोनवर मैत्री जमावण सोडून प्रत्यक्षात आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ओळखीच्या लोकांशी संवाद साधावा अशी मैत्री किंवा संबंध चिरकाळ राहतात. आयुष्य हे पूर्णतः आपल्या निवडीवर अवलंबून असते. आपल्या जगण्याच्या पद्धती आणि चूक बरोबर गोष्टींच्या ओळखीवर ते बांधण्यात येते त्यामुळे आपले निर्णय विचारपूर्वक घ्यावे. या फसव्या गोष्टींचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीचं महत्त्व ओळखून त्याचबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com