विंटर शॉपिंगची वेळ झाली... 

winter shopping time
winter shopping time

थंडी हा आपल्या सर्वांचा आवडता ऋतू आला आणि विंटर शॉपिंगचीही वेळ झाली! यंदाच्या थंडीत आपण पादत्राणांपासूनच शॉपिंगला सुरवात करूयात. थंडीपासून बचाव करण्यासाठी कपड्यांबरोबर इतर ऍक्‍सेसरीजही महत्त्वाच्या असतात. यापैकी शूज, बूट, लोफर्स हिवाळ्यातील पेहरावावर अगदी उठून दिसतात. पाहूया थंडीसाठी बाजारात काय काय आले आहे... 

मुलींसाठी बाजारात स्टायलिश विंटर शूज आले आहेत. हिवाळ्यात बहुतेक मुली डार्क जीन्स आणि टी-शर्ट, वूलनच्या टॉप्सना प्राधान्य देतात. यावर शोभून दिसणारे शूज गुडघा किंवा घोट्यापर्यंतच्या उंचीचे मिळतात. यामध्ये प्युअर लेदर, फरचे, चेन असलेले, बेल्ट, लॉकसारख्या डिझाइन्सचे मिळतात. काही शूजना स्निकरसारखे लेसचे डिझाइनचे प्रकार मिळतात. 

- कलरफूल मोजे 
विंटर शूज म्हटल्यावर त्यावर मोजे घालणेही गरजेचेच असते. किरकोळ विक्रेत्यांकडे मुला-मुलींसाठी लोकरीचे मल्टिकलर मोजे खास दिसतात. या मोज्यांवर तुम्हाला स्टार, टेडीबेअर, पक्षी आदी डिझाइन्स पाहायला मिळतात. मल्टिकलर मोज्यांची प्रचंड व्हरायटी सध्या बाजारात आली आहे. आपल्या वॉर्डरोबमधील प्रत्येक ड्रेसला मॅचिंग सॉक्‍स तुम्हाला खरेदी करता येतील. 

शूज : लहान मुलांचे बूट किरकोळ, होलसेल विक्रेत्यांकडे, तसेच नामांकित ब्रॅंडच्या शोरूममध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे आणि थंडीपासून संरक्षण होण्यासाठी विविध प्रकारचे स्टायलिश विंटर शूज नक्की ट्राय करा. 

- कॅज्युअल शूज
तरुणांना ऑफिसमध्ये रेग्युलर वापरासाठी कॅज्युअल शूज हा उत्तम पर्याय आहे. या शूजमध्ये लेसचे, सोलचे कॉन्ट्रास कॉम्बिनेशनदेखील मिळते. या प्रकारांशिवाय फोम असलेले जाड सोलचे बूट आणि लहान मुलांसाठी कलरफुल विंटर बूट बाजारात आले आहेत. 

- लोफर्स/ स्निकर्स ज्या मुलांना खूप हेवी शूज नको असतात त्यांच्यासाठी बाजारात लोफर्सचा पर्याय उपलब्ध आहे. यापैकी नामांकित ब्रॅंडचे लोफर्स टिकाऊ असतात. प्लेन ब्राउन, ब्लॅक, ग्रीन कलर्सना प्राधान्य दिले जाते. कापडी, वेलवेटचे आवरण असलेले स्निकर्स मुलांसाठी एकदम परफेक्‍ट ऑप्शन आहे. मुलांसाठी डार्क ब्ल्यू, ब्लॅक-ऑरेंज कॉम्बिनेशनचे, व्हाइट-ब्ल्यू कॉम्बिनेशनचे स्निकर्स फॉर्मल पेहराव वगळता सगळ्या प्रकारच्या कॅज्युअल्स वेअरवर ते उठून दिसतात. 

विंटर स्पेशल स्कार्फ 

स्कार्फची एव्हरग्रीन फॅशन रोज नवनवीन रूपात तुम्हाला पाहायला मिळते. हिवाळ्याची चाहूल लागल्याने आपण पेहरावात थोडा बदल करतो. जिन्स, केप्री, फॉर्मल शर्ट-पॅन्टवर वेगवेगळ्या पद्धतीचे स्कार्फ घेतल्यास हिवाळ्यात एकदम खास दिसते. एरवी फॅशन म्हणून इन असलेला स्कार्फ आता तरुणांच्या गरजेची ऍक्‍सेसरी झाली आहे. या स्कार्फचे बाजारात जितके प्रकार आले आहेत, त्यापेक्षा ते जास्त पद्धतीने रॅप करण्याचे प्रकार फॅशन फॉलोअर्सना माहिती झाले आहेत. हे नेमके कोणते प्रकार ते बघूया. 
- बाजारातील स्कार्फचे प्रकार 
- ऍनिमल प्रिंट 
- फ्लफी फ्रिंगिंग स्कार्फ 
- ऍबस्ट्रॅक्‍ट स्कार्फ इन मल्टिकलर 
- ट्रिबल प्रिंट टसेल स्कार्फ 
- स्पार्कले 
- फ्लोरल 
- फोल सर्कल व्हाइट अँड ब्लॅक इन्फिनिटी 
- मिक्‍स प्रिंट 
- फ्रिंगिंग वाय 
- रस्ट (बेसिक नॉट स्नूड) 
- क्रोचेट (मारिया क्रोचेट नॉट स्नूडड) 
- वेलवेट 
- प्लेड (ब्लॅंकेट स्कार्फ) 
- टसेलेस. 
- बोहो स्टाइल 
- चंकी 
- हाउन्डस्टूथ 
- फेदर प्रिंट ब्लॉंग स्कार्फ 
- ब्लॅंकेट 
- क्‍लासिक 
- ट्रिबल फ रिंगिंग 
- साउथ वेस्टर्न पॅटर्न स्कार्फ 

विंटर सीजनमध्ये तरुणी कॉटन, सिल्क, पश्‍मिरा, काश्‍मिरी सिल्क, सॅटिन या अशा फॅब्रिक्‍समधील स्कार्फला प्राधान्य देतात. ट्यूनिक टॉप, स्ट्रेचेबल शर्ट, फॉर्मल शर्ट, टी-शर्ट, मिनी वा लॉंग स्कर्ट, फॉर्मल ड्रेस, जीन्स पॅन्ट, लेगिंग्ज अशा प्रत्येक पेहरावावर स्कार्फ उठून दिसतात. त्यामुळे स्कार्फची क्रेझ वाढताना दिसते. स्कार्फचा उपयोग थंडी, धूळ, ऊन, रस्त्यावरून जाताना चेहऱ्यावर काही उडू नये यासाठी होतोच, त्याचबरोबर फॅशन म्हणून गळ्याभोवती रॅप केल्यास खास दिसतो. "एक्‍स्ट्रा ऍक्‍सेसरीज म्हणून स्कार्फ घेतला जातो. 
- कुठल्याही टी-शर्ट, कुर्ती, शर्ट किंवा अगदी ओढणी असलेल्या पंजाबी ड्रेसवरही मुलींना स्कार्फ बांधतात. 
- ज्या खूप मुलींना ज्वेलरी आवडत नाही, अशांसाठी स्कार्फ म्हणजे सर्वस्वच असते. डिझायनर स्कार्फ गळ्यात असल्यास इतर कोणत्याही ज्वेलरीची गरज पडत नाही. 
- मुलांमध्येही स्कार्फची फॅशन बॉलिवूड आणि मराठी गायक, अभिनेत्यांमुळे लोकप्रिय होत आहेच. मुलांसाठी फ्रिंगिंग तसेच पिक्‍सेल प्रिंटेड स्कार्फच्या डिझाइनची क्रेझ दिसते. 
- हे स्कार्फ ऑनलाइन, तसेच किरकोळ कपड्यांच्या दुकानांमध्ये, नामांकित बुटिक्‍समध्ये, शॉपिंग मॉलमध्येही तीनशे रुपयांपासून दोन-अडीच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com