esakal | सुट्टी दोन दिवसांची 
sakal

बोलून बातमी शोधा

government-office

सुट्टी दोन दिवसांची 

sakal_logo
By
अतुल क. तांदळीकर

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्या साठी 5 दिवसाचा आठवडा करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयावर 'कडू' आडनाव असलेल्या मंत्र्यांनेच खूप 'गोड' प्रश्न केला आहे.5 दिवसाचा आठवडा असताना सरकारी कर्मचाऱ्यांना सात दिवसांचा पगार कशाला? असा हा प्रश्न? हा प्रश्न सरकारी कर्मचारी सोडून सगळ्यांना गोड वाटेल. याचे कारण असे की ,ज्यांना ज्यांना या कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीचा अनुभव आला आहे ते या प्रश्नाचे समर्थन करतील.

आपल्या महाराष्ट्रात जवळपास 19 लाख सरकारी कर्मचारी आहेत यात जे या 5 दिवसाच्या आठवड्याच्या कामकाजातून वगळले आहेत ते लाख 2 लाख. हे सोडले तरी विविध विभागात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे आठवड्यातून पाचच दिवस काम करावे लागणार असल्यापेक्षा 2 दिवस रजा मिळणार याचा आनंद अधिक आहे,कारण तसेही हे कर्मचारी काम करतात यावर कोणाचा विश्वास बसेल असे वाटत नाही, कारण नोकरशाहीच्या आडमुठ्या कामाने प्रत्येक जण चिडलेला आहे व त्याचे प्रतिबिंब याच सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलेल्या या संतापात आहे. राज्यातील सर्व सामान्यांचा हाच संताप आहे.कोणत्याही विभागात सामन्याचे काम सहजासहजी झाले असा अनुभव कोणीही शेअर करीत नाहीत,काही अपवाद असतीलही पण एक मंत्री जेव्हां अशा कर्मचाऱ्यांबद्दल ही प्रतिक्रिया देतो,तुकाराम मुंढे सारखा अधिकारी जेंव्हा अशा कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे सातत्याने प्रयत्न करून त्यांची अकार्यक्षमता अधोरेखित करतो तेव्हा नक्कीच हे कर्मचारी अकार्यक्षम आहेत हे स्पष्ट होते आणि आता सरकारने या अकार्यक्षम असलेल्या लोकांना आठवड्यातील 2 दिवस सुट्टी देऊन स्वतः ची देखील अकार्यक्षमता सिद्ध केली आहे.

आणखी ब्लॅाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याहून कळस म्हणजे ज्या पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रात आजकाल विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लागले आहे त्या शिक्षक संघटना देखील आम्हाला 2 सुट्ट्यांची मागणी करताहेत,त्यांना 5 दिवसाचा आठवडा हवा,त्यांना म्हणे माध्यमिक शाळा संहितेनुसार शाळांना आठवड्यात 30 तास काम करणे बंधनकारक आहे त्यामुळे काही शाळांत म्हणे 5 दिवसांचा आठवडा आहे,बरं या लोकांनी तर्क काय भारी लावलेत बघा,असे जर केले तर शाळेतील वीज,पाणीपुरवठ्यात  बचत होऊ शकते,विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी सोडून हे भलतीच काळजी करताहेत, शाळा - शाळा मध्ये रोज होणारा वीज, पाण्याचा  अपव्यय यांना कधी दिसला नाही त्यासाठी एखादा तुकाराम मुंडे सारखा खमक्या अधिकारी आला की हे सर्व स्वतःला कार्यक्षम म्हणविणारे खाली माना घालून काही दिवस का होईना कामे करताना दिसतात पण मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या..कडू काय मुंडे काय याना नकोसे होतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारने या निर्णयामुळे फार टीका होऊ नये म्हणून कार्यालयांची वेळ सकाळी 9.45 ते 6.15 अशी केली.पण यामुळे त्यांची कार्यपद्धती सुधारेल असा विश्वास सामान्यांना नाही या आधी देखील असा प्रयोग झाला होता त्यातूनही काहीच साध्य झाले नाही हा इतिहास आहे.त्यामुळे त्यांचा 2 दिवस सुट्टीचा आनंद दीर्घकाळ टिकेल असे दिसते, कडुंचा गोड प्रश्न मात्र क्षणिक ठरणार आहे,आणि सामान्यांचे व्हायचे तेच वाटोळे होणार आहे,ज्या दिवशी हे कर्मचारी 5 दिवस प्रामाणिकपणे काम करतात असा विश्वास नागरिकांना वाटेल तो सुदिन आणि दुसरी बाजू लक्षात घेतली तर प्रत्येक सरकारी कार्यालयात पुरेसे मनुष्यबळ बळ निर्माण होईल तो देखील सुदिन.

loading image