विशेष लेख : शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’

‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’मुळे शाळेचा पहिला दिवस उत्सवात; नवागतांचे गुलाबपुष्पांनी स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके-गणवेश, ‘पहिले पाऊल’ उपक्रमातून शिक्षणाविषयी आकर्षण वाढवण्याचा प्रयत्न
Statutory Educational Mandates: Reviewing the RTE Act Compliance and Enrollment Optimization

Statutory Educational Mandates: Reviewing the RTE Act Compliance and Enrollment Optimization

Sakal

Updated on

राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि शैक्षणिक वर्षाची सुरूवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात होईल. यासाठी विदर्भातील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रात यंदाचा ‘शाळा प्रवेशोत्सव’ 15 जून 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com