Saint Margaret Marathi Primary School
sakal
सावित्रीबाई आणि जोतिबांच्या आजही कायम राहिलेल्या पाऊलखुणांपैकी एक असलेल्या पुणे कॅम्पातील घाशीराम कोतवालच्या मध्ययुगीन गढीच्या अगदी समोर असलेली ही सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळा.
सावित्रीबाई आणि जोतिबाचे शिक्षक दाम्पत्य असलेल्या मार्गारेट आणि जेम्स मिचेल या स्कॉटिश मिशनरींचे इथेच वास्तव्य होते, येथील आवारातच फुले दाम्पत्याने शिक्षण घेतले याविषयी आता शंका नसावी.