India China Relation : भारत-चीन संबंधांना पुन्हा सहकार्यात्मक वळण?
Wang Yi : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत-चीन संबंधांना सहकार्यात्मक दिशा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सीमावादामुळे द्विपक्षीय संबंध बिघडू नयेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बिजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ``ड्रॅगन (चीन) न हत्ती (भारत) यांच्या सहकार्यात्मक नृत्याची संकल्पना’’ पुन्हा एकदा मांडली असून, ``दोन्ही देशांसाठी हाच एक योग्य मार्ग’’ असल्याचे म्हटले आहे.