Dasara Melava: सभांआधी Teaser चा नवा Trend कसा आला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

Dasara Melava: सभांआधी Teaser चा नवा Trend कसा आला?

टीझर... हा प्रकार आपल्यापैकी बऱ्याच जणांचा परिचयाचा असेल...आतापर्यंत आपण चित्रपटाचा, वेबसीरिजचा टीझर नेहमीच पाहत आलोय... परंतु सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे, ती म्हणजे दसरा मेळाव्यावरुन जारी झालेल्या टीजरची.. खरंच राज्याच्या राजकारणात सभेपूर्वी टीझर जारी करण्याचा प्रकार यापूर्वी होता का? राजकीय सभेच्या टीझरचा ट्रेन्ड कसा सुरु झाला...? टीझरचे नेमके उद्देश काय असतात...?

टीझर जारी करण्याचा प्रकार पूर्वी होता का?

राज्यात सध्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळतोय.. याच दसरा मेळाव्याचे टीझर सध्या चर्चेचे विषय ठरतायत... असे असले तरी सभेपूर्वी टीझर हा प्रकार यापूर्वी राज्याच्या राजकारणात फारसा पाहायला मिळाला नाही... अगदीच विविध राजकीय पक्षांच्या गाजलेल्या सभेचा संदर्भ घेतला असता, टीझर हा प्रकार आढळून येत नाही... फक्त सभेपूर्वी बॅनरबाजी, पोस्टरबाजी करत वातावरण निर्मिती केली जात होती....त्यामुळे सभेपूर्वी टीझर हा प्रकार पाहायला मिळाला नाही... कारण त्यावेळी असलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा अभावही हेही त्याला एक कारण होतं.

सभेच्या टीझरचा ट्रेन्ड कसा सुरु झाला...?

मे, २०२२ मधील सभेचा एक टीझर सर्वात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जारी केला होता.... या टीझरची जोरदार चर्चा झाली होती... कारण त्यावेळी त्यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यावरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं. हे होत नाही तोच राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐतिहासिक बंड पुकारलं, आपला वेगळा गट स्थापन केला आणि त्यावरुन तापलेलं राजकीय वातावरण आपण आताही अनुभवतोय.... तर तिकडे शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती आणि त्याच मुलाखतीचा एक टीझरही जारी केला होता.... तेव्हापासून राजकीय क्षेत्रात टीझर हा प्रकार चर्चेत आला...आता तर शिवसेना, शिंदे गट यांच्या दसरा मेळाव्यासंदर्भातील विविध टीझर सध्या ट्रेन्ड बनले आहेत... इतकंच नाही तर नुकतचं भाजपा नेत्या पंकजा मुंढे यांनीही आपल्या भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या सभेचा टीझर जारी केलाय...

आता समजून घेवूयात या राजकीय सभांचे टीझर जारी करण्याच नेमके उद्देश काय असतात?

१ – टीझरच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करणे.

२ – विरोधी पक्षाला टीझरच्या माध्यमातून आव्हान देणे.

३ – आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपापल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचणे आणि त्यांच्यात उत्साह निर्माण करणे.

४ – सभेत नेमके कोणते मुद्दे किंवा विचार मांडले जातील याची संबंधितांना, कार्यकर्त्यांना पूर्वकल्पना देणे.

५ – एकंदरीतच सभेची पार्श्वभूमी तयार करणे...

तर हा असा आहे हल्लीच्या सभेच्या टीजरचा ट्रेन्ड.. सभेचे टीजर आणि राजकीय खडाजंगी याबाबत तुम्हाला काय वाटतं.... हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा...