

महिला आरक्षणाची भाजपची खेळी का फसली? सीमांकनाचा पेच आणि मोदींच्या 'आक्रमक' भाषणामागचे राजकीय सत्य!
Sakal
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, केरळ, तामिळ नाडू, आसाम या राज्यात व केंद्रशासित पुडुचेरीमध्ये विधानसभेच्या निवडणुकात महिलांच्या मतांचे पीक काढण्याची संसदेच्या खास अधिवेशनातील भाजपची खेळी फसली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजपला लोकसभेत इतका दारूण पराभव पाहायला मिळाला नव्हता. म्हणूनच निवडणूक आचारसंहिता लागू असताना तिचे उल्लंघन करून मोदी यांनी सरकारी प्रसारमध्यमाचा गैरवापर करीत विरोधकांवर निव्वऴ आगपखड केली.