
नवी दिल्ली 17 मे, 2025: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत बिनभरवशाचे, चंचल प्रवृत्तीचे, आणि `अहं’ ला सर्वाधिक महत्व देणारे धाकदपटशः आहेत. कोणत्या क्षणाला ते बदलतील, याची खात्री कुणीच काय, खुद्द ते ही देऊ शकत नाही.
बैसरनच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर चढविलेल्या हल्ल्यात मध्यस्थीचा दावा करून युद्धविराम केल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आणि सारं जग चकित झालं.