कोरोनाला रोखण्यात चीनला यश कसं आलं?

डॉ. पंकज रमेश नातू
गुरुवार, 26 मार्च 2020

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस कोविड १९ला जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केला. हा विषाणू खूप विनाशकारी आहे व जगातील सर्व देशांमध्ये वेगाने पसरत आहे. पण, या व्हायरसचा फैलाव चीनमध्ये कसा झाला?

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस कोविड १९ला जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केला. हा विषाणू खूप विनाशकारी आहे व जगातील सर्व देशांमध्ये वेगाने पसरत आहे. पण, या व्हायरसचा फैलाव चीनमध्ये कसा झाला? चीननं त्यावर नियंत्रण कसं मिळवलं? हा उत्सुकतेचा विषय आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरस पहिल्यांदा डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील हुबेई प्रांताच्या वुहान शहरात आढळला होता. त्यानंतर तो जगभरात प्रसार करत अत्यंत चिंताजनक व भयंकर स्वरूपाचा झाला आहे. ह्या रोगाची सुरुवात चीन मधे झाली. पण, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, व्हायरसचे केंद्रबिंदू चीनमधून इटली आणि स्पेनसारख्या युरोपीय देशांकडे गेले आहे. चीनने प्रभावीपणे ऍडमिन्सट्रेटिव्ह कार्यनीती लागू केल्यामुळे व्हायरसची हालचाल मंदावण्याच्या चिनी प्रयत्नांचे आज जागतिक समुदाय कौतुक करत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव होण्याच्या त्याच्या या पाचव्या टप्प्यात, चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोणतीही नवीन कोरोन वायरस पॉसिटीव्ह केस आढळली नाही. १.3 अब्जाहून अधिक लोकसंख्येची संख्या असूनही चीनने समर्थपणे व्हायरसशी लढा दिला व त्याला माघार घ्यायला भाग पाडले आहे. 

चीनला अनेक देशांनी कोरोना व्हायरसचा प्रवर्तक आणि कोरोन वायरसला चाइना व्हायरस किंवा वुहान व्हायरस म्हणून संबोधले गेले. पण, चीनने ह्या बदनामीकारक विधानांना यशस्वीपणे आपल्या कोरोनाविरोधी लढा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ११ मार्च २०२०ला चीनमधील कोरोना व्हायरस कोविड १९ संबंधित वैद्यकीय रूग्णांच्या घटत्या घटनेची नोंद केली आहे आणि महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी चीनी प्रशासनाच्या प्रभावी प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

चीनने आपल्या वैद्यकीय रणनीती नुसार, कोरोना व्हायरस ओळखणे, वर्गीकरण करणे, प्रभावी चाचणी, निदान करणे आणि जलद वैद्यकीय सहाय्य करणे ही कृती अवलंबली. ह्या प्रभावी रणनीतीचा आदर्श जागतिक वैद्यकीय समुदायाला देण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चिनी लोकांकडून वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणे,  दहशतीची परिस्थिती उद्भवू न देणे, तर्कशक्तीवर विश्वास ठेवणे आणि खोट्या संवादावर विश्वास न ठेवता सहकार्य केल्याबद्दल चीनी जनतेचे अभिनंदन केले आहे.

चीनने केलेले उपाय

१. 23 जानेवारी 2020 रोजी ११ दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या वुहान सिटी आणि 24 जानेवारी 2020 रोजी एका महिन्यासाठी ५८ दशलक्षाहून अधिक लोकसंख्या हुबेई प्रांत पूर्णपणे बंद करणे. यामुळे कोरोन व्हायरसची गती कमी झाली आहे आणि चीन आणि संपूर्ण जगातील इतर शहरांमध्ये पसरण्यास विलंब झाला आहे.

२. वुहान सिटीमध्ये प्रवासी बंदी आणि शाळा निलंबित, मनोरंजन स्थळे आणि सार्वजनिक मेळाव्यांवरील बंदी, नागरिकांसाठी आरोग्यविषयक नियमित तपासणी बंधनकारक

३. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय समुदायाने मोठा त्याग व मोलाचा वाटा

४. कॉरोन वायरस पॉसिटीव्ह केसेस ओळखून रोगींना वेगळं ठेवणे आणि अलगाव उपाय

५. वेगवान पद्धतीने बांधकाम व काही आठवड्यांत चीनमधील १४ रुग्णालयांची स्थापना वूहान सिटीमध्ये दोन रुग्णालये युद्धपातळीवर तयार. २६०० खाटा निर्माण ज्या कॉरोना विरोधी मोहिमेसाठी सज्ज  
 
६. सर्व चिनी नववर्ष उत्सव आणि देशातील सांस्कृतिक उपक्रम थांबवविले

७. लोकांनी त्यांच्या सरकारच्या कृती आणि उपायांवर विश्वास ठेवला

८. खोट्या बातम्या टाळण्यासाठी फक्त सरकारी माध्यम धोरणाचा वापर

चिनी प्रशासनाने साथीला सामोरे जाण्यासाठी सामूहिक, समन्वित आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन तैनात केला. या आव्हानात्मक परिस्थितीत लोकांनी दाखवलेली एकता आणि शिस्तबद्ध कृती या यशासाठी फार मोलाची आहे.

आज पाश्चात्य देश कोरोना व्हायरस हल्ल्याचा प्रतिकार करण्यास मदत करण्यासाठी चिनी तज्ञांकडे येत आहेत. कोरोना व्हायरस विरूद्ध जागतिक युद्ध अद्याप सुरू आहे. परंतु, सर्व देशात वाढत असलेल्या प्रसार थांबविण्यासाठी चीनच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याची गरज आहे. जागतिक समुदायाने चीनी कार्याचे कौतुक केले पाहिजे आणि चीनी प्रशासनाने कोरोना विषाणूविरूद्ध युद्धात तैनात केलेल्या रणनीतींचा उपयोग करून हे युद्ध जिंकणे गरजेचे आहे.

डॉ. पंकज रमेश नातू, डायरेक्टर, ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनॅजमेण्ट, मुंबई 

इतर ब्लॉग्स