East West Centre : `इस्ट वेस्ट सेन्टर’च्या संचालक मंडळावर डॉ समीर सरण नियुक्त

भारतासाठी बहुमान; टाटा या पदावरून निवृत्त झाले असून, येत्या ऑक्टोबरपासून डॉ सरण आपल्या पदावर रूजू होतील.
Dr Sameer Saran appointed on Board of Directors of East West Centre
Dr Sameer Saran appointed on Board of Directors of East West Centresakal
Updated on

East West Centre : होनोलुलूतील प्रसिद्ध `इस्ट वेस्ट सेंटर’च्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून दिल्लीतील `ऑब्झर्व्हर्स रिसर्च फौंडेशन’चे अध्यक्ष डॉ समीर सरण यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्यासंदर्भात `सेन्टर’चे जनसंपर्क प्रमुख डेरेक फेरार यांची मेल मला आली. भारतासाठी हा एक बहुमान आहे.

या पूर्वी मंडळाचे सदस्य होते, प्रसिद्ध भारतीय उद्योगपती टाटा समूहाचे रतन टाटा. टाटा या पदावरून निवृत्त झाले असून, येत्या ऑक्टोबरपासून डॉ सरण आपल्या पदावर रूजू होतील. ल विशेष म्हणजे,

इस्ट वेस्ट सेन्टरच्या वॉशिग्टनमधील मुख्यालयाचे उपाध्यक्ष व संचालक विचारवंत सातू लिमये हे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जागतिक समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी सातत्याने परिसंवाद आयोजित केले जातात.

डॉ सरण यांनी `भारत व जग’ या विषयावर 11 जुलै रोजी उद्बोधक भाषण दिले. त्यात भारताच्या उंचावलेल्या जागतिक प्रतिमेचे विश्लेषण करून, त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची वाटचाल कशी सुरू आहे व भारत हा दक्षिण व उत्तरेला जोडणारा दुवा कसा आहे, याचे महत्व विषद केले व `इंडो-पॅसिफिक’ परिसरात भारत बजावित असलेल्या कामगिरीचा उल्लेख केला.

`इस्ट वेस्ट सेंटर’चे संचालक मंडळ तसेच अध्यक्ष मे.ज.श्रीमती सूझन व्हारेस लुम यांनी त्यांच्या नेमणुकीचे स्वागत केले आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ जेम्स स्कॉट यांनी म्हटले आहे, की दक्षिण आशियातील आघाडीचे विचारवंत म्हणून सरण यांच्या विद्वत्तेचे बहुमोल मार्गदर्शन केंद्राला मिळणार आहे.

Dr Sameer Saran appointed on Board of Directors of East West Centre
Voilence in America: अमेरिकेत गोळीबार सत्र सुरुच, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ३ मृत्युमुखी

त्यास प्रतिसाद देताना निवड व नियुक्तीबाबत केंद्राचे आभार मानीत डॉ सरण यांनी म्हटले आहे, ``हिंद- प्रशांत महासागर विभागात सेन्टर मोलाचे कार्य करीत आहे. त्यादृष्टीने नवी भागीदारी, नवनव्या कल्पनांची रूजुवात व या परिसरातील निरनिराळ्या समूहांचे एकत्र येणे, हे परिसराचा (त्यातील राष्ट्रांची) विकास व त्यापलीकडील भविष्य यासाठी कळीचे ठरणार आहे. त्या दृष्टीने मंडळाबरोबर कार्य करण्याकडे मी पाहात आहे.’’

अमेरिकेच्या दृष्टीने भारत- अमेरिका संबंधांना भविष्यात अनन्य साधारण महत्व येणार असून, त्यादृष्टीने `इस्ट वेस्ट सेंटर’ महत्वाची भूमिका बजावणार आहे. `सेन्टर’चे प्रशासकीय मंडळ 18 मान्यवर सदस्यांचे आहे. त्यातील पाच सदस्यांची नेमणूक हवाईचे गव्हर्नर करतात. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अऩ्य पाच सदस्यांची नेमणूक करतात.

Dr Sameer Saran appointed on Board of Directors of East West Centre
Hindi in America : अमेरिकेतील शाळांमध्ये शिकवली जाणार हिंदी भाषा; १०० हून अधिक लोकप्रतिनिधींचा बायडेन यांना प्रस्ताव

आणि दहा सदस्य आशिया व पॅसिफिक परिसरातून अऩ्य दहा सदस्यांची निवड करतात. शिवाय हवाईचा गव्हर्नर, अमेरिकेचे साह्यक शिक्षण व सांस्कृतिक मंत्री व हवाई विश्वविद्यालयाचे अध्यक्ष, असे तीन गैर प्रशासकीय सदस्य असतात.

`ओआरएफ’ हा भारतातील प्रथम क्रमांकाचा `थिंक टँक’ असून या व्यतिरिक्त `सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’, मुंबईतील गेटवे थिंक टँक, यांचा समावेश करता येईल.

दिल्लीस्थित `ऑब्झर्व्हर्स रिसर्च फौंडेशनचे (ओआरएफ)’ अध्यक्ष या नात्याने डॉ समीर सरण दर वर्षी आंतरराष्ट्रीय विचारविनिमयाशी संबंधित रायसीना डायलॉगचे आयोजन करतात. या मुख्य कार्यक्रमात भू-राजकीय व भू-आर्थिक विषयांवर जागतिक तज्ञांची चर्चासत्रे होतात.

Dr Sameer Saran appointed on Board of Directors of East West Centre
Nashik Cyber Crime: घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष पडले महागात; महिलेला 15 लाखांना घातला गंडा

त्यांना केंद्र सरकारचा पाठिंबा असून,` सायबर सिक्युरिटी व इंटरनेट गव्हर्नंन्स’ या विषयावरील वार्षिक परिषदेचे व चर्चासत्राचे अध्यक्षत्व डॉ सरण करतात. त्यांनी आजवर निरनिराळ्या विषयांववर चार पुस्तके लिहिली आहेत.

त्यात `द न्यू वर्ल्ड डिसऑर्डर (सह लेखक शशी थरूर),’ `पॅक्स सिनिका- इम्प्लिकेशन्स फॉर द इंडियन डॉन (सह लेखक अखिल देव)’, `फायनान्सिग ग्रीन न्ट्रान्झिशन्स,’ `ए न्यू कोल्ड वॉर,’ `फ्यूचर ऑफ वर्क इन इंडिया’ यांचा समावॆश आहे.

`इस्ट वेस्ट सेन्टर’च्या गेल्या साठ वर्षांच्या वाटचालीतील वेगवेगळ्या शिक्षणक्रमांचा लाभ आजवर 2940 भारतीय विद्यार्थ्यांना झाला असून, साठीच्या दशकात नागपूर विद्यापिठातील प्रा. एन.आर. देशपांडे हे एक वर्ष अध्यापन करणारे तेथील पहिले भारतीय होते. तसेच, गेल्या वर्षी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मे.ज. श्रीमती सूझन व्हारेस लुम या पॉलिनेशियन वंशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com