अमेरिकेच्या अति दक्षिणेकडील फ्लॉरिडा राज्यातील एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क हे एक अनोखे राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचा विस्तार तब्बल 15 लाख 8976 एकर (6 हजार चौरस कि.मी.) आहे. त्याला मगरींचे `आगर’ म्हणता येईल. अंदाजे 2000 ते 2500 मगरी आणि सुसरींचे वास्तव्य तेथे आहे. या पार्कची भ्रमंती, म्हणजे डोळ्यांपुढे कायमचा तरळणारा अनुभव होय.