
नवी दिल्ली : जॅकसनव्हिल, मायामी-डेड- ओरलँडो, डेस्टीन, पनामा सिटी, पेन्साकोला, होमस्टेड, टँम्पा ही फ्लॉरिडातील महत्वाची शहरे. त्यातील मायमी हे शहर सुंदर समुद्र किनारे, नाईटलाइफ, कला, चित्रपटांचे छायाचित्रण यासाठी प्रसिद्ध. तर ओर्र्लँडो हे डिस्नेलँडसाठी नावाजलेले. या दोन्ही शहरांकडे अमेरिकन व जगातील पर्यटकांची धाव असते. होमस्टेड व एव्हरगल्डेस सिटी या फ्लॉरिडाच्या नकाशातील अतिदक्षिणेकडील शहरातून की-वेस्ट (की याचा अर्थ बेट) या अमेरिकेतील शेवटच्या शहर वजा बिंदूकडे निमुळता रस्ता जातो.