
सोमनाथ पुंड
शब्द हे फक्त संवादाचं माध्यम नसून गुन्ह्याचा पुरावा ठरू शकतात. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, गुन्हेगार फक्त हातोडा किंवा बंदूक वापरत नाही तर तो कीबोर्ड, माईक आणि मोबाईल , समाज माध्यम वापरतो. त्यामुळेच न्यायाच्या प्रक्रियेत 'शब्द' यांचं महत्त्व वाढलेलं आहे. हेच केंद्रस्थानी घेणारं शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक भाषाशास्त्र.