सोमनाथ पुंड
भाषाशास्त्र आणि इंग्रजी विषयाचे अभ्यासक सोमनाथ पुंड हे सध्या संवाद कौशल्य, सॉफ्ट स्किल्स, उच्चारशास्त्र (Phonetics), आणि फॉरेन्सिक भाषाशास्त्र (Forensic Linguistics) या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. इंग्रजी आणि भाषाशास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आहे.
ते ‘एंडेवर अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेद्वारे त्यांनी शासकीय विभाग, विद्यापीठे, महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक व व्यावसायिक संस्थांमध्ये संवाद व व्यक्तिमत्त्व विकास, भाषिक कौशल्ये, मुलाखत तयारी, उच्चार कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्सवर आधारित प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत.
सोमनाथ पुंड यांचा अभ्यास भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या परस्परसंबंधांवर आहे. स्थानिक भाषांचे भवितव्य, डिजिटल माध्यमातील भाषेचे स्वरूप आणि डिजिटल भाषाशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे महत्त्वाचे विषय आहेत. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात भाषा कशा प्रकारे बदलत आहे, स्थानिक भाषांची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे या विषयांवर ते लेखन करतात.