

Religious Conversions in Ancient India
esakal
स्वातंत्र्याची ऐंशी वर्षे साजरा करणाऱ्या देशाने अलीकडेच स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि लागोपाठ राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्रात धर्मांतर स्वातंत्र्य कायदा मंजूर केला. पुण्यातील गुरुवार पेठेतील पंचहौद चर्च शहराचा एक मौलिक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय वारसा आहे.
या पवित्र नाम देवालयाच्या एकशेतीस फूट उंचीच्या टोलेगंज मनोऱ्यात असलेल्या भल्यामोठ्या जाडजूड घंटांच्या नादांतून नियमितपणे संगीत निर्माण केलं जाते. दरवर्षी ख्रिस्तजयंतीला या घंटानादातून ख्रिस्तजन्माची मराठी मधुर गीते किंवा ख्रिस्तमस कॅरोल्स गायली जातात. तसेच देशाच्या स्वातंत्र्यादिनी `जन गण मन अधिनायक जय हे' हे राष्ट्रगीत गायले जाते. ख्रिस्ती देवळाच्या घंटानादातून स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीताचे स्वर गायले जाण्याची देशातील ही बहुधा एकमेव प्रथा असावी.