Marathi Statement: `मीच हे सांगितले पाहिजे'

Marathi Statement That Highlights Responsibility and Conviction: स्वतःची भूमिका मांडताना ‘मीच हे सांगितले पाहिजे’ असे का म्हटले?
Mech He Sangitle Pahije Marathi Phrase Meaning Context and Why This Statement Can Become a Powerful Headline

Mech He Sangitle Pahije Marathi Phrase Meaning Context and Why This Statement Can Become a Powerful Headline

sakal

Updated on: 

कामिल पारखे

महाराष्ट्रीय ज्ञानकोश'कार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पत्नीने `मीच हे सांगितले पाहिजे' अशा शिर्षकाचे एक पुस्तक लिहिले आहे. मुळच्या जर्मन ज्यू असलेल्या एडिथ विक्टोरिया कोहन (Edith Victoria Kohn) यांनी केतकरांशी अथर्ववेदानुसार व्रात्यस्तोम विधिव्रत लग्न केल्यानंतर हिंदू धर्म स्वीकारला.

व्रात्यस्तोम विधिव्रत लग्न हे एक वेगळेच प्रकरण आहे, ते विषयांतर येथे मी टाळतो. तर या धर्मांतरानंतर एडिथ कोहन या शीलवती केतकर बनल्या.

त्या काळात महाराष्ट्रातल्या काही लोकांनी युरोपात शिक्षणासाठी गेल्यानंतर परदेशी महिलांशी लग्ने केली होती. उदाहरणार्थ, सकाळ दैनिकाचे संस्थापक- संपादक नारायण भिकाजी तथा नानासाहेब परुळेकर. विवाहानंतर त्यांच्या फ्रेंच पत्नीने शांताबाई हे नाव घेतले. या दाम्पत्याच्या कन्या म्हणजे लिलाताई परुळेकर. केसरीचे संपादक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नातू ग. वि. केतकर यांनीही परदेशी महिलेशी विवाह केला होता. त्यामुळे त्यांना केसरीचे संपादकपद सोडावे लागले होते.

Loading content, please wait...