
पहलगामनजिक बैसरन खोर्यात 22 एप्रिल रोजी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी ठार केलेल्या 26 भारतीय पर्यटकांचा वचपा घेण्यासाठी भारताने उचललेल्या लष्करी कारवाईचे रूपांतर युद्धात झाले आहे. चीनने पाकिस्तानला आवर घालण्याचा प्रयत्न केल्यास ते थांबू शकते. अऩ्यथा, त्याची तीव्रता वाढत जाणार, यात शंका उरलेली नाही. भारत करीत असलेल्या लष्करी कारवाईचे देशात सर्वत्र स्वागत होत आहे.
युद्धाचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा अंदाज या घडीला घेणे शक्य नाही. गेल्या तीन दिवसात युदधाची झळ फक्त सीमाभागातील जम्मू- काश्मीर, पंजाब, राजस्तान व गुजरात या सीमालगतच्या या चार प्रमुख राज्यांना लागली असून, देशात सर्वत्र सतर्कतेचे आदेश देऊनही, बव्हंशी राज्यात स्थिती समान्य आहे.