नवी दिल्ली - अखेर इराणमधील नतांझ, फोर्डो व इस्फाहान येथील अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर अमेरिकेने 22 जून 2025 रोजी हवाई हल्ला करून त्यांची अपरिमित हानी केली.
'इराण आता अऩेक वर्षे अण्वस्त्र निर्मिती करू शकणार नाही,’ असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तर, इराणचे काही महिन्यांचेच नुकसान झाल्याचे दुसरे वृत्त आहे. त्यांच्या अनेक शास्त्रज्ञांना इस्रायलने ठार केले असले, तरी युरेनियम समृद्ध करून अण्वस्त्र निर्मिती करण्याचे ज्ञान इराणने पूर्णपणे गमावलेले नाही. या हल्ल्याने अमेरिका पुन्हा पूर्व पदावर येऊन आक्रमणकारी व विस्तारवादी देश बनला आहे.