
भारतातील स्टँड-अप कॉमेडी गेल्या काही दशकांत वेगाने विकसित झाली आहे. टेलिव्हिजनच्या स्क्रीनपासून ते यूट्यूब आणि मोठ्या स्टेज शोपर्यंत हा प्रवास अत्यंत वेगवान राहिला आहे. मात्र, या विनोदविश्वाचा तपास घेतल्यास काही महत्त्वाचे सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्न उपस्थित होतात.
कॉमेडीत वर्चस्व कोणाचं असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो ,भारतीय स्टँड-अप कॉमेडीमध्ये बहुतांश कलाकार उच्चवर्णीय आणि शहरी मध्यमवर्गीय समाजातून येतात. मनोरंजनाच्या इतर क्षेत्रांप्रमाणेच येथेही सामाजिक आणि आर्थिक वर्चस्व असलेल्या लोकांनी ही जागा व्यापलेली आहे. पारंपरिक सर्कशीत ‘जोकर’ बहुतेक वेळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित समाजातून येत असत. मात्र, आधुनिक स्टँड-अप कॉमेडीत ही जातीय गणिते अदृश्य झाली आहेत. हे कलाकार शहरांतून येतात, इंग्रजी किंवा शहरी हिंदीतून परफॉर्म करतात आणि त्यांचे प्रमुख ग्राहक मध्यमवर्गीय प्रेक्षक असतात ,चांगला बदल हाच की ह्या बाबतीत किमान जात व्यवस्था पाळली गेली नाही. विशेषतः स्त्रियांकडे बघण्याचा सरंजामी, मूलगामी/प्रतिगामी दृष्टिकोन आजच्या कॉमेडी मधून अजूनही पाझरतो आहेच.