Navratri Day 7: कालरात्री

Kalaratri Devi, Navratri Day 7, Goddess Durga : नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. चंड-मुंड आणि रक्तबीज राक्षसांशी संबंधित पौराणिक कथा, देवीचे स्वरूप, पूजाविधी, मंत्र आणि गूळ व दुग्धजन्य पदार्थांच्या नैवेद्याचे महत्त्व जाणून घ्या.
Kalaratri Devi, Navratri Day 7,

Kalaratri Devi, Navratri Day 7,

esakal

Updated on: 

डॉ. अपर्णा कल्याणकर

कालरात्री:आज सातवी माळ! कालरात्री देवीची! सर्वांना मारणाऱ्या काळाची ही विनाशिका म्हणून ही कालरात्री! पार्वतीने आपल्या शरीरातून अंबिका (कौशिकी) देवीला बाहेर काढले. त्या सुंदर अंबिकेला पाहून शुंभ नावाच्या राक्षसाला तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली. त्याने चंड आणि मुंड नावांच्या आपल्या दूतांना अंबिकेला आणण्यासाठी पाठवले. गिरिराज हिमालयाच्या अत्युच्च सुवर्णमय शिखरावर सिंहावर आरुढ झालेल्या स्मितहास्य करणाऱ्या अंबिका देवीला उन्मत्त झालेले शुंभ-निशुंभ राक्षसांचे दूत चंड-मुंड हे आपल्या सैन्यासह देवीला पकडण्यासाठी आले तेव्हा देवी त्यांच्यावर अत्यंत क्रोधाविष्ट झाली.त्या वेळी क्रोधातिशयाने तिचे मुखकमल काळे-निळे झाले. क्रोधामुळे भुवया वक्र झाल्या. तिच्या कपाळातून एकदम अकराळ विकराळ मुखाची खड्ग- पाश धारण केलेली रौद्रस्वरूपी काली देवी बाहेर पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com