ऑईल स्प्रेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cooking

ऑईल स्प्रेअर

स्वयंपाकात अनेक पदार्थ करताना कमी तेलाची गरज असते. काही पदार्थांमध्ये तर हे तेल अगदी समान पद्धतीनं लावण्याची आवश्यकता असते. मात्र, चमच्यानं किंवा विशिष्ट प्रकारच्या बाटल्यांचा वापर करूनही हे शक्य नसतं. यासाठी उपयोगी पडतो तो ऑईल स्प्रेअर. ज्या प्रकारे आपण झाडांवर पाणी स्प्रे करतो तशाच प्रकारे तेल स्प्रे करण्याची सुविधा हे उपकरण देतं. त्यामुळे अगदी कमी तेल समान पद्धतीनं लावणं शक्य होतं. पारंपरिक पद्धतीनं तेल लावण्यापेक्षा जलद पद्धतीनं तेल लावता येतं. अनेक पदार्थ किंचित तेल लावून मायक्रोवेव्ह करावे लागतात, त्यासाठी तर हा स्प्रेअर खूपच उपयुक्त ठरतो. नेहमीच्या पद्धतीनं तेल लावताना हात नेहमी तेलकट होतात, तेल सांडतं आणि पुन्हा स्वच्छता करणं हीसुद्धा डोकेदुखी असते. मात्र, ऑईल स्प्रेअरमध्ये हे सगळं सोपं होतं.

वैशिष्ट्ये

बेकिंग, रोस्टिंग, फ्राइंग, बार्बेक्यू अशा विविध गोष्टींसाठीही उपयुक्त.

अगदी कमी तेलाची आवश्यकता असते तेव्हा लांबून स्प्रे करून हवा तो परिणाम साधता येतो.

कॅलरींबाबत अतिशय जागरुक असणाऱ्यांसाठी उपयुक्त.

तेल ओतणं सोपं. काम झाल्यावर स्वच्छ करण्यासही सोपं.

तेल वाया जाण्याची शक्यता कमी होते.