Kushmanda Devi, Navratri Day 4
esakal
डॉ. अपर्णा कल्याणकर
कूष्मांडा देवी :आज नवरात्रीची चौथी माळ! आजच्या दिवसाची अधिपती देवता म्हणजे कूष्मांडा देवी! आपण तिची माहिती घेऊ या. देवी भागवत महापुराणात देवी मुखातून निघालेले एक महावाक्य आहे-
'सर्वं खल्विमेवाSहम् नान्यदस्ति सनातनम्।'
देवी म्हणते- 'अस्तित्वात असलेले सर्व काही केवळ माझेच आविष्कार आहेत. माझ्यापासून अन्य कशाचेही स्थायी अस्तित्व नाही. या दृश्य जगासह अदृश्य सूक्ष्म जगातील श्रीगणपती, विष्णु, रुद्र, सूर्यादी सर्व देवी-देवतासुद्धा या एकाच आदिशक्तीची विविध रूपे असून या असंख्य रूपांनी त्या महाशक्तीची लीला अनादि कालापासून चालू आहे व ती अखंडपणे सदैव चालत राहील.'