

This Wasn't Just a Trek! How We Survived Nature's Deadliest Challenge from Lonavala to Bhimashankar
eSakal
लेखक - सुशिल स. म्हाडगुत
२७–२८ सप्टेंबर २०२५ — पुणेघाट परिसरावर ऑरेंज अलर्ट होता. आभाळ फाटलेलं, ओढे-नद्या दुथडी भरून वाहत होत्या, डोंगरदऱ्यांत धबधबे गरजत होते. आणि अशा वेळी आम्ही काही वेडे भटके लोकांनी ठरवलं, “लोणावळा ते भीमाशंकर, म्हणजेच लोणावळा-भीमाशंकर रेंज ट्रेक करायचाच!”
रात्री उशिरा लोणावळा स्टेशनवर पोहोचलो. तिथून वाळवण गावी ढोकल कुटुंबीयांच्या घरी पहाटे पोहोचून थोडा विसावा घेतला. चार वाजताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह झळकत होता.. सामोरं काय येणार आहे हे माहित नव्हतं, पण मन मात्र सज्ज होतं.