

Maharashtra healthcare
ESakal
माधुरी मिसाळ, राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्रातील एखाद्या शासकीय रुग्णालयाला भेट देताना मला प्रत्येक वेळी दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. पहिली म्हणजे आपल्या डॉक्टर आणि परिचारिकांची असामान्य निष्ठा; आणि दुसरी म्हणजे आपण अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव. गेल्या दशकात भारताने आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली असली, तरी 2030 पर्यंत आवश्यक असलेले आरोग्यसेवा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ आणि आज उपलब्ध असलेल्या मनुष्यबळातील तफावत हे येणाऱ्या काळातील एक गंभीर धोरणात्मक आव्हान आहे.