राजकारण्यांनो, मराठ्यांना तुम्ही राजकीय फायद्याच्या पुढे कधी पाहणार आहात की नाही? 

महेश जगताप
Saturday, 12 September 2020

मराठे म्हटले की लगेच तुमच्यासमोर दृश्य येईल. गावचे पाटील, देशमुख, सुभ्याचे वतनदार, भलामोठा चिरेबंदी वाडा, घरात खुंटीला अडकवलेली बंदूक, दावणीला बांधलेला घोडा, अंगावर पांढरे शुभ्र कपडे, घरातील महिलांनी पत्करलेला घोषा... लोकांच्या गर्दीने गच्च भरलेली चावडी..., शेकडो एकर जमीन आणि त्यात राबत असलेले पाच पंचवीस सालगडी असं चित्र सहसा डोळ्यासमोर उभे राहतेच... होय ही होतीच परिस्थिती यामध्ये खोटं काही नाही, पण प्रश्न उरतो असे मराठा समाजामध्ये किती पाटील किती देशमुख किती वतनदार आहेत?.

मराठे म्हटले की लगेच तुमच्यासमोर दृश्य येईल. गावचे पाटील, देशमुख, सुभ्याचे वतनदार, भलामोठा चिरेबंदी वाडा, घरात खुंटीला अडकवलेली बंदूक, दावणीला बांधलेला घोडा, अंगावर पांढरे शुभ्र कपडे, घरातील महिलांनी पत्करलेला घोषा... लोकांच्या गर्दीने गच्च भरलेली चावडी..., शेकडो एकर जमीन आणि त्यात राबत असलेले पाच पंचवीस सालगडी असं चित्र सहसा डोळ्यासमोर उभे राहतेच... होय ही होतीच परिस्थिती यामध्ये खोटं काही नाही, पण प्रश्न उरतो असे मराठा समाजामध्ये किती पाटील किती देशमुख किती वतनदार आहेत?.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
थोडस या सामाजाकडेही ही वास्तवाने पाहणे गरजेचे झालं आहे. तरच आपल्याला या समाजाची शोकांतिका कळेल. आज राज्यात साडेचार कोटी लोकसंख्या मराठा समाजाची आहे .यापैकी तब्बल 93 टक्के लोकांचे वार्षिक दरडोई उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे. या समाजातील दारिद्र्यरेषेखाली 37. 8  टक्के लोकसंख्या आहे. राज्यातील सरासरी दारिद्र् लोकसंख्या  24. 20 टक्के आहे. तब्बल 13 % मराठा समाजाची दारिद्र्य संख्या जास्त आहे. समाजातील भूमिहीन व अल्पभूधारक यांची लोकसंख्या 71% च्या आसपास आहे तर सरकारी नोकरीत जेमतेम पाच टक्के इतका सहभाग आहे. शिक्षणात अतिशय मागासलेली परिस्थिती आहे.
मराठा समाजामध्ये आर्थिक अवस्था अतिशय बिकट आहे.

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

पाटील,  देशमुख, वतनदार परिस्थितीने गर्भश्रीमंत बोटावर मोजण्याइतकेच आहेत. मराठा समाजातील तरुणांची अवस्था अतिशय भीषण आहे. पुढे आड अन् मागे विहीर अशी परिस्थिती आहे. शासन दरबारी काही मागायला गेले की त्याला त्याचा भूतकाळ आठवला सांगतात. त्याला जातीचा पुरेपूर डोस दिला जातो. एक-दोन एकर जमीन, तिला पाण्याचा पत्ता नाही. त्यातूनही काही पिकलं तर त्याला भाव मिळत नाही. रोजगाराची अन्य साधन बंद, डोक्यावर कर्जाचा मला मोठा आकडा. सार आयुष्य दोन लेकरं बायको आई वडील आणि स्वतः फरपडत करीत जगतो. वेगळं काही करावं तर जातीची खोटी प्रतिष्ठा आडवी येते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या पैकी 80 टक्के पेक्षा जास्त मराठा समाजाचे शेतकरी आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मराठा समाजाचा खरा घात कोणी केला असेल तर तो फक्त आभासी जातीच्या प्रतिष्ठेने स्वकीय सधन लोकांनी केला. या आभासी प्रतिष्ठेचं राजकीय लोकांनी सर्वसामान्यांना दिलेलं गुंगीचे औषध लवकर उतरल नाही. त्यामुळे या समाजाची अर्थकारणात, शिक्षणात वाताहत झालेली आपणाला दिसून येईल. शासनाकडून येणाऱ्या थोड्याफार सवलती मराठा समाजातील सधन लोकांनीच लुबाडल्या. या सवलती, अनुदान याचा गोरगरिबांना फायदा मिळावा अशी दानत सधन लोकांची कधी  झाली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजकीयदृष्टया  शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या चार पक्षात समाज विभागला गेला आहे. या पक्षांनी मराठा समाजाचा पाहिजे तसा वापर करून घेतला. तुमचा इतिहास घोड्यांचा आहे, तलवारींचा आहे, लढण्याचा आहे माती खावी पण जात विकू नये असं पद्धतशीरपणे या समाजाच्या मनावर या पक्षांनी बिंबवलं. आणि आर्थिक दृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून राहण्यास प्रवृत्त  केलं. अजूनही समाजातील तरुण वर्ग झेंडे उचलण्यात, चळवळी, इतिहास यांच्यात रमला आहे . यातून लवकर बाहेर पडणे गरजेचं आहे. नाहीतर दर दहा वर्षांनी आरक्षण मागण्यासाठी सरकारच्या दारात स्वाभिमान विकून, त्यांना मनाचा मुजरा टाकून, हातात कटोरा घेऊन उभे राहावे लागेल.

इतर ब्लॉग्स