
Make Marathi a Career Enabler: महाराष्ट्रात भाषेच्या वापराबाबत अलीकडे अनेक चर्चा होताना दिसत आहे. "मराठी शिकणं सक्तीचं करावं का?", "परप्रांतीयांना मराठीची सक्ती करावी का?" किंवा "मराठीत रोजगार मिळतो का?" हे प्रश्न अनेक मंचांवर ऐकायला मिळतात. परंतु या चर्चांमध्ये बहुतांश वेळा भावना आणि अस्मिता पुढे येते; तर भाषा हे संवादाचे आणि प्रगतीचे माध्यम आहे, हे मूलभूत सत्य मात्र बाजूला पडत आहे असे दिसते.