नेपोटीजम की नाकर्तेपणा

ऍड.मंजुनाथ कक्कळमेली
गुरुवार, 18 जून 2020

सुशांत सिंग नक्कीच एक चांगला कलाकार होता यात शंका नाही पण त्याने प्रस्थापित विरुद्ध लढा न देता अशीच हार मानली..! आपला स्थान निर्माण करण्यासाठी प्रस्थापिता विरुद्ध लढा देणे हे अपेक्षित असत, त्यांच हिनवण सुद्धा अपेक्षित आहे, परंतु परिस्थिती पुढे शरणागती पत्करून हार मानणे ह्यात काय तो पुरुषार्थ..!

 

सुशांत सिंग यांच्या आत्महत्येनंतर सगळी लोक नेपोटिसम  म्हणून बोलत आहेत व काल सुशांत सिंगच्या आत्महत्येला सलमान खान, करण जोहर व इतर काहीं विरुद्ध तक्रार सुद्धा दाखल झाली. वास्तविक पाहता,  सुशांत सिंगच्या आत्महत्येला नेपोटिजम कारणीभुत असल्याचे सांगत आहेत शक्यतो ते खरं पण असेल परंतु इथे फक्त घराणे शाहीला दोष न देता, फक्त घराणेशाही वरच बॉलीवुड चालते का हे ही  विचार करण्यासारखे प्रश्न आहे कारण आज बालिवूड मधील प्रस्थापितांमध्ये बघितले तर यात कितीतरी उदाहरणे आपल्याला अशी दिसतील ज्यांना बॉलिवूडमध्ये गॉडफादर असून देखील करियर करता आलेलं नाही किंवा बॉलिवुडमध्ये तग धरू शकले नाहीत उदा. अभिषेक बच्चन, तुषार कपूर इ. आणि तशी जर संख्या बघितली तर आज बॉलिवूड मध्ये घराणेशाही पेक्षा नवखे कलाकार जास्त आहेत.

सुशांत सिंग नक्कीच एक चांगला कलाकार होता यात शंका नाही पण त्याने प्रस्थापित विरुद्ध लढा न देता अशीच हार मानली..! आपला स्थान निर्माण करण्यासाठी प्रस्थापिता विरुद्ध लढा देणे हे अपेक्षित असत, त्यांच हिनवण सुद्धा अपेक्षित आहे, परंतु परिस्थिती पुढे शरणागती पत्करून हार मानणे ह्यात काय तो पुरुषार्थ..!

शिवरायांना सुद्धा त्यावेळी स्वराज्य निर्माण करीत असताना प्रस्थापित मुघलशाही , आदिलशाही ह्यांना तोंड द्यावे लागले , संघर्ष करावा लागला व संघर्ष करीतच , परिस्थितीला तोंड देत स्वराज्य निर्माण करावं लागलं त्या वेळी जर राजे प्रस्थापित विरुद्ध मी कसा लढू असा विचार केला असता तर आज आपण स्वराज्य अनुभवलो नसतो..! राजे ह्या सर्व प्रस्थापित शाही विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले म्हणून आज आपण स्वराज्य अनुभवत आहोत..
मी नेपोटीजम च्या बाजूने बोलत नाही परंतु सुशांत सिंग ने जे आत्महत्या करून घेतले त्यास नेपोटीसम वा घराणेशाहीस दोष देणे कदापि योग्य नाही. आज जे प्रस्थापित आहेत ते पण कधी काळी नवखे होते, त्यांना सुद्धा खडतर परिस्थिती मधून जावे लागले असणार आहेत. आज चंदेरी दुनियेत नाना पाटेकर, अक्षयकुमार, के.के. मेनन,  इरफान खान सारखे कित्येक उदाहरण आहेत ज्यांना बॉलिवूड मध्ये कोणी गॉडफादर नव्हता पण त्यांनी यश मिळवलं पण स्वतःच्या हिमतीवर ,कष्ट करून मिळाले. 

गॉडफादर असून सुद्धा ह्या चंदेरी दुनियेत न टिकणारे चेहरे सुद्धा आहेत मग नेपोटीजमला कितपत दोष देणे योग्य ठरेल…? आज काल आपण इतके संवेदनशील का..? आपल्यात लढा देण्याची जिद्द राहिली नाही का..? यश हे कधी सहज शक्य नाही त्या साठी कष्ट व तसेच आपला दृष्टिकोन सुद्धा खूप महत्वाचे ठरते. वास्तविक मध्ये घराणेशाही कधीही चुकीचेच त्यास कधीही स्वीकारले जाणार नाही यदा कदाचित घराणेशाही वा नेपोटीजम होतच असेल तर त्यास ठाम मानाने उभे राहून लढा द्यायला पाहिजे घराणेशाहीला दोष देत हार पत्करणे म्हणजे शुद्ध नाकर्ते पण होय..!

ऍड.मंजुनाथ कक्कळमेली, सोलापूर
९४२०६५९६२८

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या