निष्काळजीपणा; कोरोना ला आमंत्रण

- डॉ. नंदिनी बिराजदार, सोलापूर  
Friday, 5 June 2020

कोरोना ही, अतिशय भयंकर, व्हायरल वैश्विक महामारी आहे, हे सर्वांना ज्ञात आहेच, मी वेगळे सांगणे नको, मग आपण सर्वजणं एकच करा "निष्काळजीपणा टाळा, कोरोना टाळा", हेच आपलं ब्रीदवाक्‍य करू व पाळूयात. 

बापरे बाप तब्बल 55 दिवस उलटले, "ना कुठं बाहेर जाता येते ", "शी बाई पार्लर नाही, किट्टी नाही ", "काय राव सुट्टा नाही ", "मोस्ट बोअरींग, नो हॉटेलिंग, नो मूव्ही ", "कमॉन यार नो जिम, नो रनिंग ", छे, छे अवघड झाले मॉर्निंग वॉक नाही, नो योगा ", काय हो बाबा, खेळ नाही, गार्डन नाही, आईस्क्रीम नाही, भेळ, पावभाजी नाही,"अशा नानाविध तक्रारी!, आयांच्या, बाबांच्या, मित्र मंडळींच्या, यार दोस्तांच्या, आजी आजोबांच्या व छोट्या दोस्तांच्या, पण काय करणार? कोरोनाला कळतय का? कोरोना ला कळतो फक्त निष्काळजीपणा" 

कोरोना ही, अतिशय भयंकर, व्हायरल वैश्विक महामारी आहे, हे सर्वांना ज्ञात आहेच, मी वेगळे सांगणे नको, मग आपण सर्वजणं एकच करा "निष्काळजीपणा टाळा, कोरोना टाळा", हेच आपलं ब्रीदवाक्‍य करू व पाळूयात. 

अतिशय महत्त्वाचे एकच कोरोनाला, जात-पात, धर्म, लहान- मोठा, गरीब-श्रीमंत काही कळतच नाही कळतो, तो फक्त निष्काळजीपणा. कोरोनाचा संसर्ग व संक्रमण टाळण्यासाठी, फक्त आपल्या सवयीत बदल करूया आणि हे अतिशय सोपं आहे, असे मला वाटते, त्या साठी सर्वात महत्वाचे विनाकारण बाहेर जाणं टाळा, घरी रहा सुरक्षित रहा. 

"स्टे होम स्टे सेफ' हे सर्वांना शक्‍य नाही, अत्यावश्‍यक सेवेतील डॉक्‍टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस दल, दुधवाले, पेपरवाले, किराणा दुकानदार, व्यापारी, बिझनेसमन, बॅंक कर्मचारी, भाजीवाले, सफाई कामगार, प्रशासकीय अधिकारी वगैरे वगैरे... त्यांना एवढंच सांगणं आहे, मास्क घालणे, सतत हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टसिंग करणे, कमीतकमी संपर्क, हस्तांदोलन नको आणि कामे संपवून घरी जाता, तेव्हा घरी फोन करून दरवाजा उघडण्यास सांगा, पोचल्यावर गाडीच्या किल्ल्या, पैशाची पाकिटे/पर्स, मोबाईल इ.सॅनिटाईज करा, कुठे ही हात न लावता सरळ स्नान करावे व कपडे सोक करावे. एवढेच लक्षात ठेवा, हे आपण फक्त न फक्त स्वतःसाठी करतं आहोत व पर्यायाने कुटुंबासाठी. 

बाहेरून आलेली कुठलीही वस्तू लगेच वापरू नका. पेपर शक्‍यतो 2 तास ऊन्हात ठेवा किंवा सॅनिटाईजर मारून वाचा. दुधाच्या पिशव्या धुवून वापरा. भाजीमंडईतून आलेली पिशवी दारातच ठेवून चार तासांनी भाजी, फळे सोड्याच्या पाण्याने धुवून मगच वापरा. किराणा सुध्दा लगेच वापरू नका. घरात शक्‍यतो कोणाला घेवू नका परंतु कामानिमित्त आलेल्यांना सॅनिटाईजर द्या व मास्क घालण्याचा आग्रह करा, घरकाम करणारे कामगारांना मास्क वापरणे बंधनकारक करावे व त्या वेळेस ज्येष्ठांनी व लहान मुलांनीसुध्दा मास्क घालावे. शक्‍यतो मॉर्निंग वॉक टाळा, घरातच व्यायाम करा, गच्ची आहेच हक्काची. 

अरे वा! एवढं सोपे आहे तर , परवाच, डॉ.अतुल गवांडे (महाराष्ट्रीयन पण सध्या NRI), ऑक्‍स्फर्ड युनिव्हर्सिटी चिफ सायंटिस्ट यांना ऐकण्याचे भाग्य लाभले, त्यांनी फक्त चारचं गोष्टी सांगितल्या 
1. सतत मास्क वापरा 
2. सतत हात स्वच्छ धुणे 
3. सोशल डिस्टसिंग 
4. सर्दी, खोकला, ताप असलेल्यांना भेटणं टाळा (डॉ. सोडले तर सगळे हे करू शकतात) 

मला वाटते एवढे तर आपण करूया आणि कोरोना टाळूया. करून तरी बघा. 

इतर ब्लॉग्स