

न्यू यॉर्कमधील जेलस्क्रॅपर्स
esakal
आजवर आपण स्कायस्क्रॅपर (गगनचुंबी) हा शब्द अयकत आलोय. पण, प्रसिद्ध नियतकालिक ‘द इकॉनॉमिस्ट’ ने जून २०२६ मधील अंकातील लेखात ‘द जेलस्क्रॅपर’ हा नवा शब्द वापरला आहे, तो न्यू यॉर्कमध्ये बांधल्या जाणाऱ्या गगनचुंबी तुरूंगाच्या संदर्भात.
भारतातील तुरूंगांच्या इमारतींची उंची जास्तीजास्त २१ फूट असते. पण १ हजार कैद्यांच्या राहाण्याची व्यवस्था असलेल्या न्यू यॉर्कमध्ये बांधल्या जाणाऱ्या तुरूंगाच्या इमारतींची उंची तब्बल ३३५ फूट असेल, म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उंचीपेक्षाही ( चौथऱ्यासह ३०५ फूट) अधिक. न्यू यॉर्क नजिक रिकर्स बेटावरील तुरूंगात ६७०० कैदी राहातील, अशी व्यवस्था आहे. तेथून कैद्यांना आता न्यू यॉर्कमध्ये बांधण्यात येणाऱ्या चार गगनचुंबी तुरूंगात हलविण्यात येइल.