आता गरज विचार बदलण्याची...

मनाली पाटील
गुरुवार, 26 मार्च 2020

गेल्या दोन तीन दिवसांच्या बातम्यांमध्येकोरोनाचा रूग्ण फरार किंवा ज्यांना Home quarantine चा शिक्का मारलाय असे लोक सर्रास बाहेर फिरतायत अशा बातम्या, पोस्ट बघायला मिळाल्या. यावर या लोकांना गांभीर्य नाही वगैरे वगैरे comments येतायत. काही विकृत मानसिकता सोडली तर मला वाटतय यात समाजाचाही वाटा आहे. तो असा की वर्षानुवर्षे आपल्या समाजाची मानसिकता फार वाईट आहे.

एखाद्या रोगाकडे आपण नुसता रोग किंवा आजार म्हणून बघत नाही. आजार झालेल्या त्या व्यक्तीला प्रेमाची आपुलकीची वागणुक मिळत नाही. याऊलट तिरस्कार किंवा गुन्हेगारासारखी वागणूक मिळते. आपण कित्येकदा mental illness किंवा physically disabled असणाऱ्या लोकांकडे एकटक बघत रहातो, उगाच. त्या नजरेतून त्यांना ते काहीतरी वेगळे आहेत किंवा, ते सामान्य समाजात रहाणार्‍या,वावरणाऱ्या व्यक्तींसारखे नाहीयेत हे सतत जाणवून दिलं जातं. त्यामुळं कित्येक पालक आपल्या मुलांना समाजाशी introduceच करुन देत नाहीत. सतत लपवलं जातं अशा लोकांना. परत समाजाचं frustration अशा लोकांवर काढलं जातं ते वेगळच आणि म्हणूनच खास आपल्याला कोरोना साठीची विशेष काळजी घ्यायला लावलीये हे समाजात कळालं तर लोकं, समाज आपल्याशी कसा वागेल? आपण बरे झाल्यावर समाज आपल्याला आहे तसा स्वीकारेल का? असे प्रश्नही असू शकतात लोकांचे.

हे अतिशय चुकीच आहे हे मलाही माहितीये. पण कायाय ना आपलं सगळं आयुष्य समाज निगडित आहे तर त्यांचा विचार हा नेहमीच होणार. मग भलेही त्यात आपला जीव जावो अथवा दुसऱ्यांचा. अनेक वर्ष आपण समाज बदलायच्या गोष्टी करतोय पण राहणीमान सोडलं तर मानसिकता अजून तिचाय बुरसटलेली.

आजारी लोकांना म्हणजे नुसता ताप वगैरे जरी आला असेल तर ती माणसं भावुक होतात. त्यांना सहानुभूतीची,प्रेमाची गरज असते ना की सतत रोखलेल्या नजरेची. काही होणार नाहीये स्वतःची काळजी घ्या इतकंच वाक्य पुरे असतं...

लोकांना लढायची ताकद हवी असती फक्त आणि तुमचं एक पॉझिटीव्ह वाक्य ते करू शकत. तर आता समाज म्हणून आपले विचार बदलू, विचार करण्याची पद्धत बदलू. तरच अशा संकटातून बाहेर पडू.

इतर ब्लॉग्स