

Tracing Phule Couple's Mentors
Sakal
Tracing Phule Couple's Mentors : `पुत्र सांगती चरित पित्याचे' अशी ग. दि. माडगुळकर यांच्या `गीतरामायणा'तील एक प्रसिद्ध ओळ आहे. काल रविवारी सकाळी काहीशी अशाच प्रकारची अवस्था माझी झाली होती.
पुण्यातील सदाशिव पेठ आणि कॅम्पातील दोन ध्रुवांच्या संस्कृतींना जोडणाऱ्या लक्ष्मीरोडच्या सिमावर्ती भागातल्या क्वार्टरगेटमधील उण्यापुऱ्या दोनशे वर्षे जुन्या असलेल्या ख्राईस्ट चर्चमध्ये अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी मी उभा होतो.
चर्चमध्ये रविवारी उपासनाविधीसाठी जमलेल्या भाविकांना संबोधून बोलण्याची माझ्यासारख्या प्रापंचिकांवर कधी वेळ येत नसते.