
जवळजवळ शंभर वर्षे ही वास्तू पुणे शहराची एक स्काय लाईन, एक ओळख होती. जसे फुले मंडईचा विशिष्ट आकाराची तो मनोरा, पुणे कॅम्पमधले यहुदी किंवा ज्यू लोकांचे ते लाल देऊळ, रेस कोर्सजवळचे जुन्या वानवडीमधले पूर्ण सफेद रंगातले सेंट पेट्रिक केथेड्रल..तिकडे पॅरिसमध्ये आजसुद्धा एफेल टॉवरला हे भाग्य लाभले आहे.