बुधवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जी घटना घडली, ती नक्कीच दुखद, वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. या घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे. पण आता ११ जणांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण? आरसीबी? विराट कोहली? बंगळुरू पोलीस? की ते स्वतः? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात ही चेंगराचेंगरीची घटना टाळता आली असती का? तर हो, नक्कीच टाळता आली असती.