बहिष्काराबरोबरच आत्मनिर्भरताही हवी...

Self reliance is needed along with exclusion in india
Self reliance is needed along with exclusion in india

कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर पसरला. गतिमान मानवी जीवन सर्वाधिक काळ लॉकडाउन केले. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. आता व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. तरीही अनेक व्यवहारांवर निर्बंध कायम आहेत. या सर्वांस चीन जबाबदार आहे, अशी मानसिकता केवळ भारतातच नव्हे, तर जगभर तयार होऊ लागली आहे. त्यातूनच चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तू न वापरण्याबाबत, खरेदी न करण्यासाठी प्रबोधन सुरू आहे. यातूनच चिनी वस्तूंची होळी ठिकठिकाणी सुरू आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी इतकेच पुरेसे नाही. चीनच्या वस्तूचे वैशिष्ट्य म्हणजे जीवनात उपयोग व कमी किमतीत उपलब्धता हे आहे. यात टाचणीपासून मोबाईलपर्यंत अनेक वस्तू आहेत.

चीनला धडा शिकविण्यासाठी भारतीयांनी पेटून उठताना त्यांच्या वस्तूला टक्कर देण्यासाठी अल्प किमतीत वस्तू निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. एवढेच नव्हे, तर दोन पैसे जास्त असले तरी भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करण्याची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. असे झाले तरच चीन वस्तूंचा बहिष्कार हा दीर्घकालीन उपाय होऊ शकेल. चीनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी उद्योगाबरोबरच विविध विद्यापीठे व संस्थांनी अभ्यासपूर्वक उत्पादन खर्च कमी करून वस्तूच्या किमती कशा कमी राहतील, त्यांची स्पर्धात्मकता कशी वाढेल, यासाठी अभ्यास गट नेमावेत. तसेच अभ्यासक्रमात अशा बाबींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

सामान्य ग्राहकांची मानसिकता पाहिल्यास त्याचा बाजारात तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या वस्तू खरेदी करण्याकडे कल असतो. भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास करून चिनी उत्पादकांनी आपली उत्पादने भारतीय बाजारपेठेत आणली आहेत. त्यासाठी किंमत हा घटक महत्त्वाचा ठरला आहे. स्वस्त असेल अशा वस्तू निर्मिती करून अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्या पोचवण्याची यंत्रणा उभी केली आहे. त्या तुलनेत भारतीयांनी तसे प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ठीक आहे, एकदा वापरून फेकून देऊ, अशा मानसिकतेतून वस्तू खरेदी केली जात होती.
म्हणून केवळ आंदोलनापुरते बहिष्कार ही मानसिकता असू नये. काही वर्षांपूर्वी फटाक्‍यांच्या बाबतीत असा प्रयत्न झाला. त्यानंतर भारतीय उत्पादकांनी चिनी फटाक्‍यांना पर्यायी फटाके तयार करण्यासाठी प्रयत्न केले. त्याला बऱ्यापैकी यश आले आहे, असे संघटित प्रयत्न जर छोट्या-छोट्या वस्तूंच्या बाबतीत अगदी खेळण्यांच्या बाबतीत झाल्यास भारतालाही चीनशी स्पर्धा करून त्यांच्यावर मात करणे शक्‍य होणार आहे. अन्यथा दोन दिवस मीडियात चमकण्यासाठी केलेला उद्योग ठरू शकतो. दीर्घकाळात आत्मनिर्भर भारतासाठी भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदीस प्राधान्य, अशीच सर्वांची मानसिकता होण्याची गरज आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com