१००% राजकारणासाठी ठाकरेंचं राजकीय सीमोल्लंघन

आदित्य ठाकरे गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी प्रचाराला जाणारे पहिले ठाकरे
Shivsena
ShivsenaSakal

८०% समाजकारण आणि २०% राजकारण करत सुरू झालेली शिवसेना आता १००% राजकारणाच्या दिशेने वाटचाल करतेय. तसे संकेतच २३ जानेवारी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार येत्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सहकार संस्थांच्या, तसेच जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेना पक्ष अध्यक्षांनी घेतलाय. याच वेळी आता देशाच्या राजकारणात देखील शिवसेना उभी राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं होतं. त्याचीच सुरुवात आता आगामी निवडणुकांमध्ये दिसणार आहे.(Shiv Sena Politics)

शिवसेनेने या आधी अनेकदा राज्य बाहेरील निवडणुका लढवल्या आहेत. पण त्यावेळी स्वतः शिवसेना प्रमुखांनी निवडणुकांसाठी कधीही प्रचारात थेट राज्याबाहेर जाऊन प्रचार केला नाही. पण या वेळी आता स्वतः ठाकरे घराण्यातील सदस्य राज्याबाहेर होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. बाळासाहेबांचे नातू, युवासेना प्रमुख, आणि राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे गोवा आणि उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचाराला जाणार आहेत.

Shivsena
चापोली ग्रामपंचायतीचा 'तो' ठराव माहिती अधिकार कायद्याच्या विसंगत

आदित्य ठाकरे यांचा प्रचार दौरा कार्यक्रम

उत्तर प्रदेश आणि गोव्यातील विधानसभेच्या निवडणूका सुरू आहेत , या निवडणुकांमध्ये शिवसेनवकडून अनेक नेते प्रचारात भाग घेणार आहेत. या निवडणुकांची जबाबदारी शिवसनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांच्यावर आहे. संजय राऊत प्रचाराची रणनीती ठरवणार आहेत. याच वेळी आदित्य ठाकरे या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरणार असल्यामुळे, आदित्य यांच्या गोवा उत्तर प्रदेशातील प्रचाराचं नियोजन संजय राउतच करणार आहेत. आदीत्यांचा प्रचार हा डोर टू डोर असणार आहे. अशी माहिती शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिलीय.

आदित्यच्या प्रचाराचा परिणाम काय होणार ?

आदित्य ठाकरे निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेश आणि आणि गोव्यात जाणार आहेत. देशभरात या प्रचाराचा एक वेगळा संदेश जाणार आहे. कारण आदित्य प्रचारासाठी राज्या बाहेर गेल्याने त्याचा सेनेला किती फायदा होईल, आणि भाजपला किती तोटा होणार आहे, हे आगामी काळात स्पष्ट होणारच आहे. कारण शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षा एकाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करत असतात. अश्या वेळी देश पातळीवर भाजपच्या हिंदुत्वाला शिवसेनेचा पर्याय समोर येणार आहे. शिवसेनेला तेव्हा किती लोक पर्याय म्हणून स्वीकारतील ते सध्या तरी सांगणे कठीण आहे, पण आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला देश पातळीवर काम करण्याची संधी मिळणार आहे.

Shivsena
पोलीसांची सतर्कता आणि माय लेकरांची भेट; वाचा सविस्तर प्रसंग

पहिल्यांदाच राज्याबाहेर निवडणुकीसाठी धनुष्यबाण

आदित्य प्रचारात उतरत असतानाच शिवसेनेसाठी आणखी एक सुवर्ण योग जुळून आला असल्याचं शिवसैनिकांच मत आहे. कारण आजवर शिवसनेने देशातील अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले, पण कधीही शिवसेनेला त्या निवडणुकांमध्ये स्वतःच्या 'धनुष्यबाण' या चिन्हावर निवडणूक लढवता अली नव्हती. राज्याबाहेरील शिवसेनेच्या पहिल्या खासदार 'कलाबेन डेलकर' या देखील शिवसेनेच्या चिन्हावर निवडणून आलेल्या नाहीत. पण या वेळी अन्य राज्यांमध्ये निवडणुकीसाठी उभे राहणारे शिवसेनेचे उमेदवार स्वतःच्या म्हणजेच शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाने शिवसनेनेला पहिल्यांदाच राज्याबाहेर 'धनुष्यबाणाचं' चिन्ह निवडणुकीसाठी अधिकृतपणे दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com