Navratri Day 5: स्कन्दमाता

Skandamata, Navratri Day 5, Goddess Durga नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कन्दमाता देवीचे पूजन केले जाते. कार्तिकेयाची माता म्हणून देवीला विशेष महत्त्व आहे. तारकासुर वधाची पौराणिक कथा, पूजाविधी, मंत्र, आवडता नैवेद्य आणि ललितादेवीच्या पूजेचे महत्त्व जाणून घ्या.
Skandamata, Navratri Day 5

Skandamata, Navratri Day 5

esakal

Updated on: 

डॉ. अपर्णा कल्याणकर

स्कन्दमाता: आज नवरात्रीची पाचवी माळ! आजच्या दिवशी 'स्कन्दमाता' या पाचव्या रूपाची पूजा करण्याची पद्धत आहे. छान्दोग्य श्रुतीनुसार शिव-पार्वतीच्या शक्तीपासून उत्पन्न झालेल्या सनत्कुमाराचे नाव 'स्कन्द' असे आहे. स्कन्द म्हणजे कार्तिकेय, षडानन, कुमार,मुरुगन,गणपतीचा मोठा भाऊ! या स्कन्दाची माता म्हणून पार्वतीला 'स्कन्दमाता' असे म्हणतात.

तारकासुर हा राक्षस वज्रांग आणि वज्रांगी यांचा मुलगा. त्याच्या मनात सर्व देव-देवतांविषयी प्रचंड राग होता. अजेय होण्यासाठी त्याने ब्रह्मदेवांसाठी घोर तप केले. ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन तारकासुराला अमरत्वाचे वरदान मागण्यास सांगितले, परंतु, तारकासुराला माहीत होते की, मृत्यू तर जन्माला आलेल्या प्रत्येकाचाच होतो, हे शाश्वत सत्य आहे,म्हणून त्याने चातुर्याने असा वर मागितला की, त्याचा मृत्यू केवळ भगवान शंकरांच्या स्वतःच्या पुत्राकडूनच व्हावा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com