अर्थव्यवस्था सावरतेय

special article for focus section by yashwant kesarkar on the topic of economic condition stand in kolhapur
special article for focus section by yashwant kesarkar on the topic of economic condition stand in kolhapur

कोल्हापूर : देशाचा विकास मोजण्याचे साधन स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) हे आहे. मात्र, त्याच्या मोजण्याच्या तंत्रावरून वाद झाला आहे. मग अर्थव्यवस्था सुधारत आहे की मंदीकडे झुकते आहे, कशाच्या आधारे ओळखायचे? तर आता त्याचे ‘वस्तू व सेवा कर’ म्हणजेच जीएसटी संकलन हे साधन ठरत आहे. जीएसटीपोटी नोव्हेंबरमध्ये १ लाख ३ हजार ४९२ कोटी रुपये जमा झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. जीएसटी संकलन मागील वर्षातील याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये ९७ हजार ४३७ कोटी रुपये एवढे झाले होते, तर ऑक्‍टोबरमध्ये ९५ हजार ३८० कोटी रुपये एवढे होते. याचाच अर्थ मागणी वाढली, पर्यायाने जीएसटी भरणा वाढला.

कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये रुतलेली अर्थव्यवस्थेची चाके आता रुळावर येत आहेत. नोव्हेंबर महिन्यात एक लाख ३ हजार ४९२ कोटी जमा होणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आनंददायी आहे. केंद्र व राज्य सरकार अर्थव्यवस्था किंवा व्यवहारांना गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका, महापालिका यांचीही जबाबदारी वाढली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा गतिशील होताना बांधकाम क्षेत्राला गती द्यायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका मोलाची ठरणार आहे. विविध परवाने, विविध सोई-सुविधांची किती गतीने पूर्तता होते त्यावरच व्यवहारांना गती मिळणार आहे.

त्याचबरोबर रोजगार संधी वाढणार आहेत. बांधकाम हे एकच क्षेत्र घेतले तर त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक मागणी वाढवणारे आहे. त्यातून दळणवळण करणाऱ्या वाहनधारकांना त्याचा लाभ होईल. लॉकडाउन कालावधीत जीवनावश्‍यक वस्तू सोडल्यास रोजगारनिर्मिती करणारी अनेक क्षेत्रे बंदच होती. आता देशातील कोरोनाचा संसर्ग तुलनेने कमी होत असल्याचे दिसून येते. मात्र, धोका कायम आहे, याची जाणीव ठेवून शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार दक्षता घेऊन अर्थव्यवस्था अधिक गतिशील कशी होईल, यासाठी सर्वच क्षेत्रांतील लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जीएसटी संकलन वाढल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शासकीय खर्चाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. गेले काही महिने आरोग्य विभागावरच जास्त खर्च करावा लागला आहे. आता इतर क्षेत्रांस निधी मिळेल, अशी आशा आहे.  परंपरागत भारतीय अर्थव्यवस्थेत पावसाळ्याचा काळ हा मंदीचा काळ मानला जात असे. पावसाळ्यात आर्थिक व्यवहार मंदावतात. दसऱ्यानंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा गती प्राप्त होते. दसऱ्यानंतर बाजारपेठेतील उलाढाल किंवा उत्साह, ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत पुढील काळात कोरोनासह जगण्याची नागरिकांची मानसिकता झाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com