कविता : "मी" मी एक मनुष्य, नाकर्ता

सुमेधा मेटकर (sumedhametkar38@gmail.com)
गुरुवार, 14 मे 2020

कवयत्री सुमेधा मेटकर यांनी सध्याच्या थोतांड मानवावर कविता केली आहे.

"मी"
मी एक मनुष्य 
नाकर्ता.... 
उभारलेले विश्व्                                                       
कुचकामी.... 
मांडलेली मते 
पोकळ.... 
बघितलेले स्वप्न 
बेभरवशी....
साकारलेले भविष्य.... 
कलंकित.... 
आजचा दिवस.... 
महाग.... 
आणि माझा मीपणा 
विचित्र.... 
 
बुडालेली छाया माझी 
आणि काळोखहि माझाच 
आणि अंधारात डौलात निघालेला 
माझा अहंकार....
स्वामित्वाचा 
सत्तेचा 
स्वार्थाचा 
मीपणाचा 
कर्तेपणाचा.... 
शिल्लकात ठेऊन नाकर्तेपणा 
कारण,
मी एक मनुष्य 
नाकर्ता....

सुमेधा मेटकर (sumedhametkar38@gmail.com)

टॅग्स

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या